Lok Sabha Election 2024 : भाजप उमेदवार पवार यांना संतप्त नागरिकांनी परत पाठवले

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना मंगळवारी नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. सुरगणा तालुक्यातील मनखेड येथे मोदी सरकारच्या निषेध करत ‘अब की बार भाजप तडीपार’ अशा घोषणा देत नागरिकांनी डॉ. भारती पवार  यांना परतवून लावले.

सुरगणा तालुक्यातील मनखेड येथे मंगळवारी डॉ. भारती पवार यांनी मोजक्या पदाधिकाऱयांसमवेत प्रचार दौरा केला. गावात प्रवेश करताच नागरिकांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत भाजपचा निषेध केला. ‘परत जा परत जा, भारती पवार परत जा’ असे नारे दिले. ‘शेतकऱयांची वाट लागली, महागाई वाढली’, ‘मोदी सरकारने केले काय, खाली डोके वर पाय’ असे म्हणत पवार यांना घेराव घातला. अनेक प्रश्नांचा भडिमार केल्याने पवार यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला.