कमी टक्केवारीचे ग्रहण सुटेना… सहाव्या टप्प्यात सरासरी 59 टक्के मतदान

लोकसभा मतदानाला लागलेले कमी टक्केवारीचे ग्रहण सहाव्या टप्प्यातही सुटलेले नाही. शनिवारी सहाव्या टप्प्यासाठी आठ राज्यांतील 58 मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 58.82 टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 78.19 टक्के तर जम्मू-कश्मिरात सर्वात कमी 51 .41 टक्के मतदान झाले.

अठराव्या लोकसभेसाठी सात टप्प्यात मतदान घेण्यात येत आहे. मतदानाचा पहिला टप्पा 19 एप्रिल रोजी पार पडला. त्यानंतर 26 एप्रिल, 7 मे, 13मे, 20 मे रोजी घेण्यात आलेल्या मतदानातही टक्का वाढवण्यात निवडणूक आयोगाला फारसे यश आले नाही. उष्णतेची जबर लाट, मतदान केंद्रावरील असुविधांमुळे टक्का वाढला नाही. शनिवारी मतदानाचा सहावा टप्पा पार पडला. या टप्प्यात आठ राज्यातील 58 मतदारसंघात मतदान घेण्यात आले. यात उत्तरप्रदेशातील 14, हरियाणातील 10, पश्चिम बंगालमधील 8, बिहारमधील 8, दिल्लीतील7, ओडिशातील 6, झारखंडमधील 4 आणि जम्मू-कश्मिरातील एका जागेचा समावेश आहे.

सकाळी 7 वाजता मतदान सुरू होताच मतदारांनी गर्दी करायला सुरुवात केली. पश्चिम बंगालमध्ये मतदानाचा वेग सुरुवातीपासूनच चांगला होता. राजधानी दिल्लीत सकाळी 10 वाजेपर्यंत चांगले मतदान झाले. सायंकाळच्या वेळी पुन्हा मतदानाने वेग घेतला. पश्चिम बंगालमध्ये झाडग्राम लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रणत टुडू यांच्या काफिल्यावर हल्ला करण्यात आला. यात दोन जण जखमी झाले. प्रचंड टीकेची झोड उठल्यानंतर निवडणूक आयोगाने आज मतदानाच्या पाचही टप्प्यांची आकडेवारी जाहीर केली.

टप्पा एकूण मतदार झालेले मतदान टक्केवारी

पहिला टप्पा 1 6.63 कोटी 1 1 कोटी 66.1 4 टक्के
दुसरा टप्पा 15.86 कोटी 10.58 कोटी 66.71 टक्के
तिसरा टप्पा 17.24 कोटी 1 1 .32 कोटी 65.68 टक्के
चौथा टप्पा 1 7.70 कोटी 12.24 कोटी 69.16 टक्के
पाचवा टप्पा 8.95 कोटी 5.57 कोटी 62.20 टक्के