पहिल्या टप्प्यातील प्रचार थांबला; विदर्भातील 5 जागांसह देशातील 102 मतदारसंघांत उद्या मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार बुधवारी थांबला. देशातील 21 राज्यांमधील 102 मतदारसंघांत शुक्रवारी मतदान घेण्यात येणार असून त्यात महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर मतदारसंघांचाही समावेश आहे.

अठराव्या लोकसभेसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान शुक्रवार 19 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे मतदानाच्या 48 तास अगोदर 102 मतदारसंघांतील प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी थंडावल्या.