कामगिरीत नीचांक पण तिकीट दरात उच्चांक; बंगळुरूचा तिकीट दर 50 हजार

स्टार खेळाडूंनी सजलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने यंदाच्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत फ्लॉप कामगिरी केली. आतापर्यंत झालेल्या सातपैकी सहा लढती गमावून हा संघ गुणतक्त्यामध्ये तळाला आहे. मात्र, कामगिरीत नीचांक असला तरी या संघाच्या सामन्यातील तिकीट दरात उच्चांक बघायला मिळतो. कारण बंगळुरूच्या घरच्या मैदानावरील (एम चिन्नास्वामी) आयपीएल सामन्याचा तिकीट दर हा इतर सर्व संघांच्या मैदानांवरील सामन्यांपेक्षा अधिक आहे, हे विशेष.

बंगळुरूच्या घरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवरील तिकिटाची जास्तीत जास्त किंमत 42,350 रुपये (कॉर्पोरेट बॉक्स) आहे, पण वाढत्या मागणीमुळे ती किंमत आता 52,938 रुपये इतकी वाढली आहे. विराट कोहलीच्या नावाने ओळखला जाणारा बंगळुरूचा संघ आयपीएलमधील प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होण्याच्या उंबरठय़ावर आहे. मात्र, तरीही या संघाचा सामना बघणाऱयांची संख्या कमी झालेली नाहीये. त्यामुळेच या संघाच्या होम ग्राऊंडवरील सामन्याचा तिकीट दर हा सर्वाधिक आहे. हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल फ्रेंचायझींना स्वतंत्रपणे त्यांच्या सामन्यांसाठी तिकिटाची किंमत ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे. लखनौ सुपर जायंट्सची तिकिटे सर्वात स्वस्त विकत आहेत. त्यांचे सर्वात कमी तिकीट 499 रुपये आहे. मात्र, जेव्हा सामना मोठय़ा संघाविरुद्ध असतो तेव्हा तिकीटाचे दर बदलतात. मोठय़ा सामन्यांमध्ये तिकिटांच्या किमतीही वाढतात आणि त्यासाठी त्यांना सर्ज प्राइसिंग (जेव्हा एखादी पंपनी मागणी वाढते तेव्हा त्याच्या उत्पादनाची किंवा सेवेची किंमत वाढवते आणि जेव्हा मागणी कमी होते तेव्हा किंमत कमी करते) धोरणाचा अवलंब करावा लागतो. काही तिकिटांची किमत खूप जास्त आहे, परंतु तरीही चाहते स्टेडियममध्ये बसून सामन्याचा आनंद घेण्यासाठी जास्त किमत मोजायला तयार आहेत. मात्र, त्यांच्या संघाची कामगिरी पाहून चाहत्यांचीही निराशा होते आणि त्यामुळे कधी कधी स्टेडियम पूर्णपणे भरत नाही.

उदाहरणार्थ, या मोसमात आरसीबीची कामगिरी खूपच निराशाजनक झाली आहे, परंतु तरीही त्यांच्या घरच्या सामन्यांना स्टेडियममध्ये प्रचंड गर्दी दिसून आली. आयपीएलमध्ये आरसीबीचा चाहतावर्ग सर्वात मोठा आहे. मात्र, चिन्नास्वामी स्टेडियमचे सर्वात स्वस्त तिकीट 2300 रुपये आहे,

आयपीएलमधील संघांचे आपापल्या होम ग्राऊंडवरील तिकीटदर

संघ           कमी दर        सर्वोच्च दर

बंगळुरू      2300   52,938

लखनौ       499     20,000

कोलकाता 750     28,000

मुंबई          990     18,000

गुजरात      499     20,000

चेन्नई       1,700  6,000

दिल्ली       2,000  5,000

राजस्थान  500     20,000

हैदराबाद    750     30,000

पंजाब        750     9,000