18, 19 जानेवारीला ‘मेस्टा’चे नववे राज्यस्तरीय अधिवेशन

महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) चे नववे राज्यस्तरीय अधिवेशन 18 व 19 जानेवारी रोजी भायखळा येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात होणार आहे. या अधिवेशनात खासगी शाळांची आरटीई प्रतिपूर्तीची थकलेली फी, शाळांसाठी संरक्षण कायदा, बोगस शाळा बंद करून नवीन शाळा मंजुरीसाठी बृहत् आराखडा लागू करण्यासंदर्भात ठराव करण्यात येणार आहेत.

अधिवेशनात यंदा प्रथमच देण्यात येणारा प्रतिष्ठेचा शिक्षणमहर्षी पुरस्कार विबग्योर हाय ग्रुप ऑफ स्कूलचे संस्थाचालक रूस्तोम केरावाला तर जीवन गौवरव पुरस्कार पोदार ग्रुप ऑफ स्कूलचे संस्थाचालक पवन पोदार, लेखिका विजया वाड व लोककला अभ्यासक प्रकाश खांडगे यांना जाहीर झाले आहेत. ‘शिक्षणमित्र’ म्हणून अजय दरेकर, योगीता तोडकर, श्रीनिवास ध्यावरशेट्टी, डा. अशोक गुप्ता यांना दिले जाणार आहेत. या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती ‘मेस्टा’चे अध्यक्ष संजय तायडे-पाटील यांनी दिली.