Accident News : मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवडच्या राहुड घाटात भीषण अपघात, 6 ते 7 जणांचा मृत्यू

मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिक चांदवडच्या राहुड घाटात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. राहुड घाटात एसटी आणि ट्रकचा अपघात झाला आहे. सहा ते सात जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना परिसरातील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात आज सकाळी 9 ते 9.30 च्या सुमारास घडला आहे. बसचे टायर फुटून अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातामुळे मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.