शेतकऱ्यांना फसवणाऱ्या मोदी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करा, नाना पटोले यांचे शेतकऱ्यांना आवाहन

2014 च्या निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांनी सरकार आले की पहिली सही शेतकरी कर्जमाफीच्या फाईलवर करेन असे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, हमी भाव देणार अशी आश्वासने यवतमाळमध्ये दिली होती पण 10 वर्षात ती पूर्ण केली नाहीत. मोदींनी शेतकऱ्यांना फसवले आहे. कांदा नाही खाल्ला तर काही फरक पडत नाही असे भाजपच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण म्हणाल्या होत्या. या शेतकरीविरोधी व शेतकऱ्यांना फसवणाऱ्या भाजपा सरकारचा करेक्ट कार्यक्रम करायची वेळ आली आहे आणि लोकसभा निवडणुकीत तो करा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. ते चांदवड येथे बोलत होते.

मोदी सरकारचे निर्णय मुठभर लोकांसाठी!

मणिपूरपासून राहुल गांधी हे शेतकरी, तरुण, कामगार, महिला वर्गाला गॅरंटी देत आहेत. 2004 ते 2014 या काळात युपीए सरकार जनतेचे, शेतकरी हिताचे निर्णय घेत होते परंतु मागील 10 वर्षात केवळ मुठभर लोकांसाठी निर्णय घेतले जात आहेत. आज शेतकरी संकटात आहे त्याला भारतीय जनता पक्षाचे सरकारच जबाबदार आहे, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.

शेतकऱ्यांना जीएसटीमधून वगळणार, पीक वीमा योजनेची पुनर्रचना करणार; राहुल गांधींची चांदवडमध्ये घोषणा