`पनौती’ आणि `पाकिटमार’ शब्दांना निवडणूक आयोगाचा आक्षेप; राहुल गांधी यांना पाठवली नोटीस

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणी राहुल गांधी यांना 25 नोव्हेंबर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.

एका सभेत राहुल गांधी यांनी क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा संदर्भ देत कोणाचेही नाव न घेता पनौती आणि `पाकिटमार’ हा शब्द वापरला होता. यानंतर भाजपने राहुल गांधी यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करत कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे.