‘आदित्य एल 1’च्या प्रवासाबाबत इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी दिली महत्त्वाची माहिती

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी हिंदुस्थानने पाठविलेले ‘आदित्य एल 1’ अंतराळ यान अंतिम टप्प्याच्या जवळ असून, त्याची ‘एल-1’ बिंदूवर पोहोचण्याची प्रक्रिया 7 जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. ‘आदित्य एल 1’चा प्रवास अंतिम टप्प्यात असून इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठविलेले ‘आदित्य एल 1’ अंतराळ यान अंतिम टप्प्याच्या जवळ असून, त्याची ‘एल-1’ बिंदूवर पोहोचण्याची प्रक्रिया 7 जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे, असे इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी सांगितले. आदित्यचा निर्धारित प्रवास सुरळित सुरू आहे. मला वाटते की, ते जवळजवळ अंतिम टप्प्यात आले आहे.

‘आदित्य-एल 1’ ही सूर्याचा अभ्यास करणारी पहिली मोहीम आहे. हे यान 125 दिवसांत पृथ्वीपासून सुमारे 1.5 दशलक्ष किलोमीटर प्रवास केल्यानंतर एल-1 भोवतीच्या प्रभामंडल कक्षेत प्रवेश करेल. एल-1 बिंदू सूर्याच्या सर्वांत जवळचा मानला जातो. ‘आदित्य एल 1’ सूर्याचे रहस्य जाणून घेण्यासाठी विविध प्रकारचे वैज्ञानिक प्रयोग करून त्याची छायाचित्रे पृथ्वीवर विश्लेषणासाठी पाठवेल. यानाची एल-1 बिंदूच्या परिघात पोहोचण्याची अंतिम तयारी सुरू आहे. ही प्रक्रिया 7 जानेवारी 2024पर्यंत पूर्ण होईल, असेही सोमनाथ म्हणाले.