ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलकडून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा; शाश्वत, उज्ज्वल भविष्याचे ध्येय

शाश्वत भविष्यासाठीविषयी वचनबद्धतेच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय शाळांची प्रमुख के12 शृंखला असलेल्या ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलने अँपल बीकेसीमध्ये एका अनोख्या कार्यशाळेद्वारे नुकताच राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला. या विशेष कार्यशाळेच्या माध्यमातून ऑर्किड्सच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा एक अनोखा अनुभव मिळाला. त्यांना शिकण्यासाठी, निर्मितीच्या दृष्टीने आणि प्रेरणा घेण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. प्रायोगिक शिक्षण सखोल विचार करण्यास शिकवते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना हवामान बदलाचा सामना करण्यासाठी कृतीनिहाय योजना विकसीत करण्यासाठीचा हा प्रयत्न होता.

यंदाच्या विज्ञान दिनाची संकल्पना “सायन्स फॉर अ सस्टेनेबल फ्यूचर” अशी आहे. या विषयातील ऑर्किड्सचे याआधीचे यश त्यातून दिसून येते. शाळेकडून पर्यावरणासंदर्भात जागरूकता निर्माण करण्यात येते. सर सी. व्ही. रमण यांच्या ‘रमण’स् इफेक्ट’ च्या अभूतपूर्व शोधाला 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्यांच्या कामगिरीला सलाम म्हणून दरवर्षी देशात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो.

ऑर्किड्स शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाश्वततेचा प्रसार करण्याच्या अनुषंगाने इयत्ता 6, 7 आणि 8 वी च्या विद्यार्थ्यांकरिता अँपल बीकेसी दालनात विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्राचे आरेखन विद्यार्थ्यांमधील पर्यावरण-चेतना प्रज्वलित करण्यासोबत समस्या सोडवण्याची कौशल्ये विकसीत करण्यासाठी, शाश्वत विकासाच्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्यासाठी करण्यात आले. यावेळी त्यांना प्रात्यक्षिक प्रशिक्षणामार्फत विशिष्ट शाश्वत संकल्पनांना संबोधित करणारे शॉर्ट व्हीडिओ आणि पोस्टरची निर्मिती करण्यासाठी फ्रिफॉर्म, कॅमेरा आणि किनोट अशी विविध अॅप्लिकेशन हाताळता आली.

या उपक्रमाविषयी अधिक बोलताना ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल’च्या व्हीपी अकॅडमिक्स, कविता चटर्जी म्हणाल्या की, आम्ही राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी देशासोबत सहभागी होताना, ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल’च्या आमच्या विद्यार्थ्यांना एक आकर्षक आणि परिवर्तनशील अनुभव देण्यासाठी मुंबईतील अँपल बीकेसीमध्ये आयोजित कार्यशाळेत आमच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षणात सहभागी होण्याची आणि नाविन्यपूर्ण शाश्वत उपाय शोधण्याची संधी मिळाली. आमच्या विद्यार्थ्यांना सक्षम करून शाश्वतता जीवनशैलीत भिनवण्यासाठी प्रोत्साहित करून, आम्ही विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची आणि पर्यावरणीय कारभाराची सखोल भावना निर्माण करण्यास मदत करत आहोत,असे त्या म्हणाल्या.

शाश्वततेवरील कार्यशाळा तंत्रज्ञानविषयक संशोधन, सहयोगात्मक शिक्षण आणि अग्रेसर विचारांची मानसिकता विकसीत करून उज्ज्वल आणि अधिक शाश्वत भविष्याकडे सामूहिक वाटचालीची गरज आहे. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने पुढील पिढ्यांसाठी शाश्वत भविष्यासाठी नवकल्पना आणि वैज्ञानिक चौकशी स्वीकारून पुढील वाटचाल करू या, असे आवाहन ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलकडून करण्यात आले.