Malegaon blast trial : भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर सुनावणीस गैरहजर; न्यायालयाचे ताशेरे

2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात न्यायालयात गैरहजर राहिल्याबद्दल NIA न्यायालयानं भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांच्यावर ताशेरे ओढले.

2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंधित सुनावणीसाठी वारंवार गैरहजर राहिल्याबद्दल प्रज्ञा ठाकूर यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केल्यानंतर एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत मुंबईतील विशेष न्यायालयाने भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांच्यावर पुन्हा एकदा ताशेरे ओढले आहेत.

ठाकूर मालेगाव खटल्यातील प्रमुख आरोपी आहेत, त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव बुधवारी सुनावणीला हजेरी लावली नाही. विशेष राष्ट्रीय तपास संस्था (NIA) न्यायालयाने असं निरीक्षण नोंदवले की प्रज्ञा ठाकूर यांची सततची अनुपस्थिती खटल्यात अडथळा आणत आहे.