Rameshwaram Cafe blast case: NIA ने ताब्यात घेतलेला संशयित भाजपचा कार्यकर्ता, सूत्रांची माहिती

बेंगळुरुत व्हाईटफिल्डमधील रामेश्वरम कॅफेमध्ये 1 मार्च रोजी झालेल्या स्फोटात नऊ जण जखमी झाले होते. गृह विभागाच्या आदेशानंतर राष्ट्रीय तपास संस्था NIA ने या स्फोटाच्या तपासाला सुरुवात केली. संशयिताला शोधण्यासाठी तपास यंत्रणेने संशयिताच्या बस प्रवासाचे अनेक व्हिज्युअल प्रसिद्ध केले होते. गंभीर बाब म्हणजे या स्फोटाप्रकरणी साई प्रसाद या भाजप कार्यकर्त्याला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती शुक्रवारी सूत्रांनी दिली.

इंडिया टुडेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) साई प्रसाद या भाजप कार्यकर्त्याला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती शुक्रवारी सूत्रांनी दिली. या कामगाराचे नाव मोबाईल शॉपीतील दोन कामगारांनी त्यांच्या तपासादरम्यान सांगितल्याची माहिती मिळते आहे, त्यांची गेल्या आठवड्यात एनआयएने चौकशी केली होती.