मी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; शरद पवार यांनी स्पष्ट केली भूमिका

 मी आगामी लोकसभा लढवणार नाही.  आगामी निकडणुकांसाठी पक्ष संघटना बळकट करण्यासाठी राज्यासह देशाचा दौरा करणार आहे. तसेच किरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीत समन्वयासाठी प्रामुख्याने भूमिका पार पाडणार आहे, असे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज स्पष्ट केले.

लोकसभा निकडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी महाराष्ट्रासह देशात सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून मतदारसंघांची चाचपणी सुरू केली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून राज्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेत असताना शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून लढावे अशी इच्छा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. मात्र शरद पवार यांनी आपण आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून लढणार नसल्याचे दिंडोरी मतदारसंघाच्या आढावा बैठकीदरम्यान जाहीर केले.

दिंडोरी लोकसभेची जागा जिंकण्यासाठी आपल्याला लढायचे आहे. त्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संघटनात्मक ताकद वाढविण्यावर अधिकाधिक भर द्यावा, अशा सूचना शरद पवार यांनी दिल्या. नवीन लोक आपल्या संपर्कात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.