अणुशक्तीनगरमधील घरांची दुरवस्था, तातडीने दूर करा नाहीतर तीव्र आंदोलन उभारू! शिवसेनेचा एमएमआरडीएला इशारा

चेंबूरच्या अणुशक्तीनगरमध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी एमएमआरडीएने बांधलेल्या घरांची दुरवस्था झाली आहे. घरांची दुरवस्था दूर करण्यासाठी मुंबई उपनगरचे तत्कालीन पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी 2022 साली एमएमआरडीएकडून मंजूर करून घेतलेल्या धोरणाची आयुक्तांनी तातडीने अंमलबजाकणी करावी, नाहीतर तीव्र आंदोलन उभारू, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने एमएमआरडीएला दिला आहे.

मुंबईतील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी बाधित झालेल्या हजारो कुटुंबांचे पुनर्वसन एमएमआरडीएने अणुशक्तीनगरमध्ये बांधलेल्या इमारतींमध्ये करण्यात आलेले आहे. मात्र, निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे कुठे घरांची कामे अपूर्ण आहेत तर कुठे गळती सुरू आहे. त्यामुळे रहिवासी हैराण झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएने या इमारतींची तत्काळ दुरुस्ती करावी, यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभाग क्रमांक 9 च्या वतीने या एमएमआरडीए वसाहतीत स्काक्षरी मोहीम राबकण्यात आली होती. रहिकाशांनी केलेल्या स्वाक्षऱ्यांसहित निवेदन शिवसेना विभागप्रमुख प्रमोद शिंदे यांच्या नेतृत्काखालील शिष्टमंडळाने आज आयुक्तांच्या कार्यालयात समाज विकास अधिकारी उद्धव घुगे यांना दिले. शिष्टमंडळात आमदार प्रकाश फातर्पेकर, विभाग संघटिका पद्मावती शिंदे, माजी नगरसेकिका अंजली नाईक, समृद्धी काते, समीक्षा सक्रे, श्रीकांत शेटय़े यांचा सहभाग होता.