‘हे’ आहेत लक्ष्मीदेवीची कृपा होण्याचे संकेत, जाणून घ्या यामागील रहस्य

श्री लक्ष्मी देवीची कृपा ज्या घरावर असते ते घर सुख समृद्धी आणि धनधान्याने भरलेले असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तिला आपल्या घरी श्री लक्ष्मीचा वास असावा, असे वाटते. याकरिता बरेच जण अनेक तऱ्हेचे उपायही करत असतात. पूजा-पाठ, व्रतवैकल्ये करून लक्ष्मीदेवीचा आशीर्वाद आणि तिची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत असतात. सूर्यास्तानंतर जर ‘हे’ शुभ संकेत मिळत असतील, तर लक्ष्मी देवीचे आपल्या घरी आगमन होणार आहे, असे समजावे, असे वास्तूशास्त्र सांगते.

घरातील दैनंदिन स्वच्छता, साफसफाई, पूजा, धार्मिक ग्रंथांचे वाचन यामुळे लक्ष्मीदेवीचा घरात अखंड वास राहतो. याव्यतिरिक्त काही शुभसंकेतही मिळतात. ज्याद्वारे देवीची कृपा होण्याचे संकेत मिळतात.

– सूर्यास्तानंतर घरात तीन पाली दिसल्या तर हा शुभ संकेत समजावा, असे वास्तूशास्त्र सांगते. घरात लक्ष्मीदेवीचे आगमन होण्याचा हा संकेत समजावा तसेच लवकरच तुमच्यावरील अनेक संकटे दूर होणार आहेत, असेही या संकेतामागील कारण सांगितले जाते.

– घरात चिमणीने घरटे बनवले असेल, तरा हा शुभ संकेत मानला जातो. या संकेताचा अर्थ असा की, श्री लक्ष्मीदेवीची कृपा होऊन तुमच्या चांगल्या दिवसांना आता सुरुवात होऊन तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे.

– धार्मिक मान्यतेनुसार, सूर्यास्तानंतर जर तुमच्या घरात काळ्या मुंग्या झुंडीने दिसत असतील, तर देवीची तुमच्यावर लवकरच कृपा होणार आहे, असे समजावे. या काळ्या मुंग्याना पीठ किंवा साखर खाऊ घाला. यामुळे लक्ष्मीमाता लवकर प्रसन्न होईल.

– तुमच्या स्वप्नात पाल, झाडू किंवा घुबड दिसले, तर हा धनप्राप्ती होण्याचा संकेत असून, असे स्वप्न शुभ मानले जाते.