‘अपमान करणं, मला कमकूवत करणं हा अटके मागचा एकमेव उद्देश’; अरविंद केजरीवाल यांचा आरोप

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गेल्या महिन्यात कथित मद्य धोरण घोटाळ्यात अटक करण्यात आली होती. बुधवारी सुनावणी दरम्यान त्यांनी सक्तवसुली संचालनालयावर टीका केली, ‘अटके मागील एकमेव उद्देश माझा अपमान करणे… मला कमकूवत करणे’ आहे. दिल्ली उच्च न्यायालयात जामीनासाठी युक्तिवाद करताना, केजरीवाल म्हणाले की ED ने ‘कोणतीही चौकशी, विधान किंवा अटकेचा आधार असू शकेल असे पुरावे नसताना’ त्यांना अटक केली आहे.

केजरीवाल यांच्या अटकेमुळे लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी तीव्र निषेध व्यक्त होत आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजप विजयासाठी प्रतिस्पर्धी पक्षांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठीच तपास यंत्रणा मागे लावून निवडणुकीत सहभागी होण्यापासून प्रतिबंधित करण्यात येत असल्याचा आरोप केला. ‘आप’ला फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी ED कडे ‘अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत’ असा युक्तिवाद केला. ‘केजरीवाल यांना अटक करताना, घरी त्यांचा जबाब घेण्याचा कोणताही प्रयत्न केला गेला नाही… त्यांना अटक करण्यापूर्वी ED ने हे करायला हवं होते’, ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, अटक म्हणजे ‘पहिले मतदान होण्यापूर्वी आम आदमी पक्षाला पाडणे’ असा युक्तिवाद केला.

सिंघवी यांनी मुख्यमंत्र्यांना अनेक समन्स पाठवल्याबद्दल ED ला प्रश्न विचारले की, ‘अरविंद केजरीवाल पळून जाण्याची शक्यता होती का? त्यांनी दीड वर्षात कोणत्याही साक्षीदारावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला का? त्यांनी चौकशी करण्यास नकार दिला का?’.