महाराष्ट्राच्या जेनेट विधीचे आव्हान संपुष्टात; रथिकाची आगेकूच

बॉम्बे जिमखाना 46 व्या महाराष्ट्र राज्य खुली स्क्वॉश स्पर्धेत महिला गटात दुसऱया मानांकित महाराष्ट्राच्या जेनेट विधीचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. दुसरीकडे अव्वल मानांकित दिल्लीच्या अनाहत सिंग हिने कमालीचे सातत्य राखताना अंतिम फेरीत धडक मारली. बॉम्बे जिमखाना कोर्टवर सुरू असलेल्या स्पर्धेत मंगळवारी तामीळनाडूच्या तिसऱया/चौथ्या मानांकित रथिका सुथंथिरा सीलनने खेळ उंचावताना दुसऱया मानांकित जेनेट विधी हिच्यावर 11-7, 11-7, 11-4 असा सनसनाटी पराभव केला. अंतिम फेरीत तिची गाठ टॉप सीडेड अनाहतशी पडेल. अनाहत हिने बिगर मानांकित महाराष्ट्राच्या सुनीता पटेल हिला 11-3, 11-5, 11-4 असे हरवले. 15 वर्षांखालील मुली गटाच्या उपांत्य फेरीत तिसऱया/चौथ्या मानांकित महाराष्ट्राच्या अनिका दुबे हिने तामीळनाडूची अव्वल मानांकित व्योमिका खंडेलवाल हिला 11-6, 11-4, 11-6 असा बाहेरचा रस्ता दाखवला. दुसरी सीडेड महाराष्ट्राच्या दिवा शाह हिने तिसऱया/चौथ्या मानांकित महाराष्ट्राच्याच ईशा श्रीवास्तव हिच्यावर चुरशीच्या लढतीत 11-9, 9-11, 10-12, 11-3, 11-9 अशी मात केली.