विद्यार्थ्यांनी घेतली दररोज वृत्तपत्र वाचण्याची शपथ

प्रत्येक विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्त्व समृद्ध करण्यासाठी वृत्तपत्र वाचन महत्त्वाचे असून दैनंदिन जीवनात मोबाईलचा वापर कमी करून तोच वेळ वृत्तपत्र वाचनासाठी कारणी लावावा, असे मार्गदर्शन दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना करण्यात आले. बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ आणि शिवशाहू प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा व करीअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 75 टक्क्यांहून अधिक गुणसंख्या मिळवून उत्तीर्ण झालेल्या सुमारे 400 विद्यार्थी पालकांसह उपस्थित होते. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याला एक हजार रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य व भेटवस्तू देण्यात आल्या.

कार्यक्रमात आरती बनसोडे यांनी विद्यार्थी व पालकांना करीअरसंदर्भात उपयुक्त माहिती दिली. आपला आवडता विषय, आपला स्वभाव, आर्थिक क्षमता अशा गोष्टींचा विचार करूनच करीअर निवडावे, असे सांगितले. कार्यक्रमात मुलांसह सर्वांनी वृत्तपत्र वाचण्याविषयी शपथ घेतली. याप्रसंगी दीप क्लासेस व ऍकॅडमीचे संस्थापक संदीप दाभिळकर, सचिव कृष्णा पाटील, नीलेश मानकर, रेखा हिरेमठ, नीलम जेठवानी (डेसिमल फाऊंडेशन मुंबई), महावीर इंटरनॅशनल मुंबई, इंट्रेमोंडे पोलिकॉटर्स लिमिटेड, प्रा. विलास नांदवडेकर, आमदार सुनील शिंदे, सामना वितरण विभागाचे प्रमुख दीपक शिंदे, उद्योजक नितीन कोलगे, सूर्यकांत कडाकणे, संदीप बेळगुंदकर, मितेश बगाडिया चार्टड अकाऊंट, सतीश पाटील, संतोष वर्टेकर, मच्छिंद्र पाटील उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे विश्वस्त जीवन भोसले, संजय चौकेकर व रवींद्र देसाई, राजू येरूडकर, संदीप चव्हाण, राजकुमार भोगण, तानाजी धनुकटे, सम्राट चव्हाण, संजय कुंभार, भालचंद्र पाटे, प्रकाश गिलबिले, हेमंत मोरे, अजय उतेकर, रवी संसारे, अजित सहस्रबुद्धे, सुशांत वेंगुर्लेकर, गणेश खेनट, शंकर रिंगे, धनंजय वायाळ यांनी मेहनत घेतली.