बाबूजींच्या भूमिकेत सुनील बर्वे

प्रसिद्ध संगीतकार आणि गायक सुधीर फडके यांचा बायोपिक डिसेंबरपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ असे या चित्रपटाचे नाव आहे. यामध्ये अभिनेता सुधीर फडके म्हणजेच बाबूजींची भूमिका सुनील बर्वे साकारणार आहे.

25 जुलै रोजी बाबूजींच्या 105 व्या जन्मदिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात बायोपिकची घोषणा झाली. चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक-निर्माते योगेश देशपांडे आहेत. ‘स्वरगंधर्व सुधीर फडकें’ चित्रपटात छोटा राम, संघर्षाच्या काळातील तरुण सुधीर आणि यशाला गवसणी घालणारे बाबूजी असा तीन टप्प्यांतील प्रवास अनुभवायला मिळणार आहे.