जात प्रमाणपत्र प्रकरण; नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नवनीत राणा यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र कायम ठेवले. यामुळे नवनीत राणा यांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निकाल देला होता. ज्याला नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठाने राणा यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर हा निकाल दिला.

‘मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानते. सत्याचा नेहमीच विजय होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर चालणाऱ्यांचा हा विजय आहे’, असे त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.