दुर्दैवाने सगळेच नात्यात अडकले, बहिणीचं प्रेम कुठेतरी कमी पडलं; सुप्रिया सुळे यांचा अजित पवारांना टोला

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद-भावजय यांच्या लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची कन्या आणि नेत्या सुप्रिया सुळे या महाविकास आघाडीकडून लढत आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार महायुतीकडून निवडणुकीचा रिंगणात आहेत. यामुळे बारामतीमधील राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘बहिणीचं प्रेम कुठेतरी कमी पडलं’, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. या दरम्यान सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘बायको म्हणाली, अहो हे काम करुन द्या, तर करावेच लागणार. नाहीतर माझं काही खरं नाही. त्यामुळे माझ्या पत्नीला निवडून द्या’, असे आवाहन अजित पवार यांनी केले होते. त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

‘आम्ही काही साधू – संत नाही, मते द्या, विकास घ्या! अजित पवारांची दौंडकरांना खुली ऑफर 

‘कदाचित बहिणीचं प्रेम कमी पडलं असेल. दुर्दैवाने सगळेच नात्यांमध्ये अडकले आहेत. मी पहिला देश, मग राज्य, मग पक्ष आणि मग नाती पाहते. मी नात्यांसाठी राजकारणात आले नाही. तर मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आली आहे. दादा असं बोलतात याचा मला आश्चर्य वाटतं’, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

Sharad Pawar : 10 वर्षांत तुम्ही काय केलं ते आधी सांगा? शेतकरी आत्महत्यांवरून पवारांनी काढली अमित शहांची खरडपट्टी

‘आम्ही 18 वर्षे एका संघटनेत काम केलं. दादा पालकमंत्री होते. मी या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून काम करत होते. तरीही दादा माझ्या कामाबाबत बोलतात याचं आश्चर्य आहे. दादांची एक खासियत होती. ती म्हणजे विरोधी पक्षाचे काम करणारा एक कणखर नेता. पण आता त्यांची भाषणं कानावर येतात तेव्हा खूप आश्चर्य वाटतं. मला माहितीये हे अजितदादा नाहीत’, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.