भिंतीवर डोकं आपटलं, चुंबन घेतलं नंतर ठार मारलं; सेक्सला नकार दिल्याने काकीची हत्या

तमिळनाडूतील चेन्नईमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 48 वर्षीय काकीने पुतण्यासोबत सेक्स करण्यास नकार दिल्याने चिढलेल्या पुतण्यानेने काकीचे डोके भिंतीवर आपटून तिला ठार मारल्याची घटना घडली आहे. 21 वर्षीय तरुणाला कोडुंगयूर येथे राहणाऱ्या आपल्या काकीसोबत सेक्स करण्याची इच्छा होती. परंतु काकीने सेक्स करणाऱ्यासाठी नकार दिल्याने चिढलेल्या आरोपीने काकीचे डोके भिंतीवर आपटले. त्यानंतर तिचे चुंबन घेतले आणि तिचे डोके भिंतीवर पुन्हा आपटून हत्या केली. मेल्यानंतरही त्याने आपल्या काकूच्या शरीराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि तिथून पळ काढला.

मृत महिला घरात एकटीच असताना आरोपी ऑगस्टिन आणि त्याचा मित्र दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आले होते. महिलेचा पती व दोन्ही मुले त्यावेळी घराबाहेर गेली होती. पुतण्या घरात आल्यानंतर महिलेने त्या दोघांनाही चहा व नाष्ता दिला. त्यानंतर ती आतल्या खोलीत कामे करण्यात गुंतली होते. आत गेलेल्या काकूचा ऑगस्टिनने पाठलाग केला व तिला पाठीमागून आवळण्याचा प्रयत्न केला. महिलेने विरोध केला तेव्हा त्याने तिला मला तुझ्यासोबत सेक्स करायचा असल्याचे सांगितले. यानंतर तो तिच्याशी अश्लीलपणे बोलू लागला. यावेळी महिलेने रागात त्याला तिथून जाण्यास सांगितले. तिने ऑगस्टिनला सांगितलं की, जर तो तेथून निघून गेला नाही तर त्याच्या आई-वडिलांकडे व अन्य नातेवाईकांकडे तक्रार करेल.

यामुळे चिडलेल्या ऑगस्टिनने तिला मारहाण करून तिचे डोके भिंतीवर आपटले आणि त्यानंतर तिचे चुंबन केले. महिलेचे दोन्ही हात पकडून ऑगस्टिन तिला मारहाण करत राहिला. त्याने अनेक वेळा तिचे डोके भिंतीवर आपटले. ऑगस्टिनने हत्या केली तेव्हा त्याचा मित्रही तिथे होता. काकीला ठार मारल्यानंतर हे दोघेही पळून गेले होते. जेव्हा मृत महिलेचा मुलगा घरी आला, तेव्हा त्याला आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्याने याची सूचना पोलिसांना दिली. प्राथमिक अंदाजानुसार, ही घटना चोरीच्या उद्देश्याने घडल्याचे दिसत होते. मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले तेव्हा त्यांना ऑगस्टिन आणि त्याचा मित्र यात दिसला होता. दोघांकडे चौकशी केली असता ऑगस्टिनने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.