पादचाऱयाचा मोबाईल हिसकावून सटकला, पण लटकला 

घराकडे निघालेल्या पादचाऱयाच्या हातातला मोबाईल हिसकावून दुचाकीने वाऱयाच्या वेगाने पसार झालेल्या सराईत चोराला अखेर गुन्हे शाखा युनिट-9च्या पथकाने पकडला. 19 वर्षीय आरोपी शिक्षण घेत असून त्याच्यावर तीन ते चार गुह्यांची नोंद आहे. 

दिनकर (नाव बदललेले) हे बुधवारी खार परिसरातून पायी जात होते. त्याचवेळी दुचाकीवरून पाठीमागून आलेल्या आरोपीने दिनकर यांच्या हातातला मोबाईल हिसकावून पळ काढला.  याबाबत कोणतीही तक्रार दाखल झाली नसताना युनिट– 9 ला ही घटना समजली. त्यानुसार पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून तक्रारदार कोण ते निष्पन्न केले. त्यानंतर खार पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार देण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यानंतर युनिट-9 समांतर तपास करत असताना सदर गुह्यातील आरोपी हा वांद्रे रिक्लेमेशन येथे असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन अमर सय्यद (19) या चोराला पकडले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने गुह्याची कबुली दिली. तसेच त्याच्याकडून गुह्यात चोरलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला. पुढील कारवाईसाठी त्याला खार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपीविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात तीन गुह्यांची नोंद आहे.