वर्षभरात महापालिकांच्या निवडणुकीची शक्यता दिसत नाही – राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एक महत्त्वाचं निवडणुकांसंदर्भात महत्त्वाचं विधान केलं आहे. एमआयजी क्लब वांद्रे येथे मनसेची एक बैठक पार पडली. राज ठाकरे यांनी बैठकीच्या स्थळी पत्रकारांशी संवाद साधला.

‘यावर्षी महापालिका निवडणुका लागतील असं वातावरण मला काही दिसत नाही. जो काही आता महाराष्ट्रात घोळ झाला आहे, त्यानुसार मला नाही वाटत की आता महापालिका निवडणुका लावतील आणि आपल्या पायावर धोंडा पाडून घेतील. त्यामुळे आता लोकसभा निवडणुका लागतील’, असा अंदाज राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

त्यादृष्टीतून आमच्या प्रत्येक लोकसभा मतदार संघाची चाचपणी होईल. प्रत्येक लोकसभा मतदार संघात आमच्या टीम्स जातील आणि त्यांना सांगितलेलं काम तिथे करतील, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.