मिठी नदी होणार स्वच्छ-सुंदर, किनारी वॉकिंग-सायकलिंग ट्रॅक; सीएसटी ब्रिज कुर्ला ते वाकोला नदीपर्यंत काम

मुंबईतील महत्त्वाच्या मिठी नदीचा पालिकेच्या माध्यमातून कायापालट होत आहे. यामध्ये सीएसटी ब्रिज कुर्ला ते माहीम कॉजवे समाविष्ट वाकोला नदीपर्यंत करण्यात येणाऱया कामात नदीकिनारी वॉपिंग आणि सायकलिंग ट्रक बांधणे, किनारी सौंदर्यीकरण करणे, फ्लड गेट बांधणे, नदीत जाणारा गटार आणि मलजलप्रवाह रोखणे, डांबरी सर्व्हिस रोड बांधणे अशा प्रकारची कामे केली जाणार आहेत. या कामासाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत. या प्रकल्पाच्या दहा वर्षांच्या प्र्रचालन व परिरक्षणासाठी पालिका सुमारे 3067.55 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे.

मुंबईत भांडुप फिल्टर पाडा-विहार तलाव परिसरात उगम पावणारी मिठी नदी मुंबईतील महत्त्वाची नदी आहे. पूर्व उपनगरात 17.80 किमी वाहणारी मिठी नदी आरे कॉलनी, कुर्ला, वांद्रे परिसरात वाहत जाऊन माहीम खाडीजवळ समुद्राला जाऊन मिळते. मुंबईत 26 जुलै 2005 रोजी झालेल्या अतिवृष्टीत मिठी नदीचे पाणी शहरात शिरल्याने मोठे संकट निर्माण झाले होते. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून मिठी नदीला पूरमुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. आता ‘मिठी रिव्हर डेव्हलपमेंट आणि पोल्युशन पंट्रोल प्रोजेक्ट-3’ अंतर्गत काम पेले जाणार आहे. या उपक्रमात पॅकेज-1 चे काम पूर्ण झाले असून पॅकेज-2 आणि पॅकेज-4 चे काम प्रोग्रेसमध्ये आहे.

सर्वच नद्यांचे पुनरुज्जीवन
पालिकेने दहिसर, पोईसर, ओशिवरा व वालभाट नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे काम हाती घेतले आहे. या उपक्रमात नद्यांचे प्रदूषण रोखणे, मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे टाकणे, पोहोच रस्ता बांधणे आणि मलजल प्रक्रिया पेंद्र उभारण्याची कामे केली जाणार आहेत. पर्जन्य जलवाहिन्यांच्या विविध कामांकरिता 2024-25 च्या अर्थसंकल्पात 1930 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अशी होणार कामे

  • नदीमध्ये येणारे गटाराचे पाणी, मलजल प्रवाह रोखणार
  • मिठी नदीचे खोलीकरण, रुंदीकरण करणार
  • किनारी भागात डांबरी सर्व्हिस रोड बांधणार
  • पंपिंग स्टेशनच्या माध्यमातून पूरस्थिती रोखणार
  • नदीच्या पुराचे पाणी रोखण्यासाठी फ्लडगेट
  • नदीकिनारी सायकलिंग टॅक, वॉपिंग ट्रक
  • महत्त्वाच्या ठिकाणी सौंदर्यीकरण करणार