पाकिस्तानात एक्सवर बंदी

 

राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे कारण देत पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने आज एक्सवर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एक्सचे मालक एलन मस्क यांना मोठा झटका बसला आहे. फेब्रुवारी महिन्यात सार्वत्रिक निवडणुकांआधीच एक्सवर बंदी घालण्यात आली होती. आज पाकिस्तान सरकारने याबाबत अधिकृतरीत्या घोषणा केली. पाकिस्तान सरकारने आज सिंध हायकोर्टात एक्सवर बंदी घालण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले.