उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे मुंबईसह राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात विद्यार्थ्यांना वह्या, टॅब वाटप, ज्येष्ठांचा सत्कार, रक्तदान आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना विभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

शिवसेना शाखा कांजूर शाखा क्र. 117 च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्ड वाटप करण्यात आले. यावेळी स्थानिक आमदार सुनील राऊत, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, उपविभागप्रमुख अनंत पाताडे, उपविभाग संघटक सिद्धी जाधव, भारती शिंगटे, अल्पिता वारंगगावडे, तानाजी मोरे, प्रभू गवस,  महेश पाताडे, उर्मिला लोके, योगेश पेडणेकर, मामा मंचेकर, मयूर गाडगे, अरविंद नागनुरी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन शाखाप्रमुख रवींद्र महाडिक यांनी केले.  

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मीरा भाईंदर संपर्क संघटक तथा दहिसर विधानसभा समन्वयक रोशनी कोरेगायकवाड यांच्या वतीने दहिसर पूर्व शांतीनगर परिसरातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना भेटवस्तू व लहान मुलांना खाऊवाटप करण्यात आले. 

बाईपण भारी देवाचा महिलांसाठी खास शो

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना शाखा क्रमांक 118(कन्नमवार/टागोर नगर) माजी नगरसेवक उपेंद्र सावंत, सुप्रिया सावंत यांच्या वतीने मोफत नेत्रचिकित्सा शिबीर व चष्मा वाटप तसेच महिलांसाठी मराठी चित्रपट बाईपण भारी देवाचा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नेत्रचिकित्सा शिबीर सकाळी 10 ते दुपारी 2 यावेळेत होणार आहे. तर बाईपण भारी देवाचा शोचे आयोजन सायंकाळी 5.15 वाजता भांडुप येथील सिनेपोलिस चित्रपटगृहात होणार आहे.  

दहिसरमध्ये दहावी, बारावीच्या 350 विद्यार्थ्यांचा गौरव 

शिवसेना शाखा क्रमांक 1 च्या वतीने आयोजन

शिवसेना  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दहिसर येथे दहावी, बारावी परीक्षेतील गुणवंत 350 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना शाखा क्रमांक-1 च्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे आयोजन दहिसर पश्चिमेकडील कांदरपाडा रिव्हर ह्यू हॉल येथे करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनो गुणवंत, यशवंत, कीर्तिवंत व्हा व आपल्या देशाचे शहराचे नाव उज्ज्वल करा, असे कार्यक्रमाचे आयोजक, माजी नगरसेवक मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर यांनी सांगितले.  

विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून फादर बिजू थॉमस प्राचार्य सेंट लॉरेन्स हायस्कूल, सिस्टर शिला प्राचार्या मेरी एमक्यूलेट हायस्कूल, अल्बर्ट डिसोजा चेअरमन अल्डेल एज्युकेशन ट्रस्ट, मॉडेल कॉऑपरेटिव्ह बँक, अनिता शर्मा प्राचार्या गोयंका इंटरनॅशनल स्कूल, तानीया वालेचा प्राचार्या रुस्तमजी पेंब्रिज हायस्कूल, प्राचार्य किरण वर्मा रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख माजी नगरसेवक उदेश पाटेकर, विभाग संघटक सुजाता शिंगाडे, माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, शाखाप्रमुख राजेंद्र इंदुलकर, अक्षय राऊत, संदीप नाईक, महिला शाखा संघटक ज्यूडीथ मेंडोसा, दीपाली चुरी, ममता मसुरकर व कार्यकर्तेपदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.