वेब न्यूज – चंद्रावर कसे राहतात अंतराळवीर

हिंदुस्थानसारख्या देशांनी यशस्वी चांद्र मोहिमा पार पाडल्या आहेत. एकूण 12 अंतराळवीरांनी चंद्रावर मजल मारलेली आहे. 1969 साली नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिले पाऊल टाकले आणि अवकाश विज्ञानाच्या क्षेत्रात मोठी भरारी मारली गेली. अर्थात सध्या तरी चंद्रावर जीवसृष्टीचा वेध घेणे हे अवघड काम आहे, तर मग अशा ठिकाणी अंतराळवीर वास्तव्य करतात कसे? असा प्रश्न कायम सामान्य माणसाला पडत असतो. अंतराळवीरांची चंद्रावरील दिनचर्या ही अगदी पृथ्वीवरील दिनचर्येप्रमाणे असते. स्लिप स्टेशनमध्ये सकाळी जाग आल्यानंतर अंतराळवीर नेहमीसारखे दात घासतात. स्वच्छतेसाठी प्रत्येक अंतराळवीराकडे स्वतःचे असे एक वेगळे किट असते. हे हायजिन किट असते. प्रसाधनगृहाचा वापर करण्यासाठी अंतराळवीरांना वेगळय़ा शारीरिक स्थितीत बसावे लागते. ते वापरत असलेले टॉयलेट वेगळय़ा प्रकारचे असते. त्याचा कमोड हवा व इतर टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी व्हॅक्युम क्लीनरप्रमाणे काम करतो. अंतराळवीर जेवणासाठी भांडी वापरणे आणि नंतर भांडी घासणे वगैरे प्रकार करत बसत नाहीत. कारण तेवढा वेळ वाया घालवणे शक्य नसते आणि त्यांचे स्पेस फूड हे डिस्पोजेबल पॅकमध्ये येत असते. खाण्यानंतर ही रिकामी पॅकेट फेकून देण्यात येतात. एका विशेष पावडरचा वापर पिण्यासाठी केला जातो. मात्र काही पदार्थ, जसे की नट्स आणि फळे ही नैसर्गिकरीत्या खाल्ली जातात. अंतराळवीर शक्यतो हलका आहार घेतात. अंतराळवीरांचे शरीर सतत गुरुत्वाकर्षणाविरुद्ध काम करत असल्याने तंदुरुस्तीसाठी ते रोज सरासरी दोन तास हलका व्यायामदेखील करतात. या व्यायामासाठी रोज काही वेळ खास राखून ठेवलेला असतो.