गुरुवारी केळी आणि खिचडी का खाऊ नये?

गुरुवार हा भगवान विष्णूचा दिवस आहे. असंख्य लोक मनोकामना पूर्ती व्हावी यासाठी गुरुवारी उपवास करतात. उपवास करण्यासाठी सर्वात मोठा नियम म्हणजे या दिवशी मिठाचे सेवन करू नये. काही लोक सायंकाळी भगवान विष्णूला गोड प्रसादाचा नेवेद्य दाखवून त्याचे सेवन करतात. भगवान विष्णूचे व्रत ठेवल्याने भाग्योदय होतो, अशी अनेकांची धारणा आहे. गुरुवारी उपवास करायचा असेल तर त्यासाठी आणखी एक नियम म्हणजे खिचडी आणि केळी खाणे वर्ज्य आहे. केळी खाल्ल्याने भगवान विष्णूची कृपा मिळू शकत नाही. तसेच देवी माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो. केळीसोबत खिचडी खाणे अशुभ मानले जाते. खिचडी खाल्ल्याने आर्थिक तंगी येऊन गरिबी वाढू शकते. घरात सुख-शांती हवी असेल तर गुरुवारी खिचडी खाणे टाळावे.