ऑनलाईन ठेपले मागवणे पडले महागात, बिल पाहिल्यावर तरुणीने ट्वीट करत शेअर केला फोटो

अहमदाबादमधील एका तरुणीला ऑनलाईन ठेपले मागवणे चांगलेच महागात पडले आहेत. या तरुणीने 60 रुपयांचे तीन ठेपले ऑनलाईन ऑर्डर केले होते. त्यानंतर ज्यावेळी हातात बिल आले तेव्हा ती चक्रावलीच. त्या अन्नपदार्थाएवढाच कंटेनर चार्जही लावण्यात आला होता.

खूशबू ठक्कर या तरुणीने ऑनलाईन ठेपले ऑर्डर केले होते. आपल्या ट्वीटर अकाऊंटवर या तरुणीने बील शेअर करत खाली फोटोओळ लिहीली आहे. जिथून मी ऑर्डर केले तिथे कंटेनर चार्ज त्या पदार्थाच्या किमती एवढाच आहे.कंटेनर चार्ज 60 रूपये? बिलानुसार, ठेपला एक प्लेट 60 रुपये होता आणि कंटेनर चार्ज 60 रुपयेच होता. झोमॅटोने या महिलेच्या ट्वीटचे उत्तर देत सांगितले की, हाय खूशबू, टॅक्स यूनिव्हर्सल आहे आणि अन्नप्रकारानुसार 5 ते 18 टक्क्यानुसार बदलते. पॅकेजिंग शुल्क आमच्या रेस्टॉरेण्ट पार्टनरद्वारा केले जाते, तेच हा चार्ज लागू करतात आणि त्यातूनच कमावतात. त्यावर खुशबूने उत्तर देताना सांगितले की, मला 60 रुपये कंटेनर चार्ज अनावश्यक आणि चुकीचा वाटतो. ग्राहकांना विना अतिरिक्त चार्ज लावून कंटेनर उपलब्ध करणे रेस्टॉरेण्टची जबाबदारी आहे.

बिलाचा फोटो शेअर केल्यानंतर या ट्वीटला 43 हजारहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. या ट्वीटवर अनेक युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.