सोलापूर, मोहोळमध्ये छापा; 77 किलो गांजा जप्त

शहर गुन्हे शाखेच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात 77 किलो गांजा जप्त करण्यात आला. याची किंमत 15 लाख 50 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.

अजित सुखदेक जगताप (रा. स्वराज विहार, सोलापूर, मूळ रा. सोहाळे, ता. मोहोळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

सोलापुरात गांजाची अवैध विक्रीबाबत माहिती घेत असताना, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांना अजित जगताप हा घरातून गांजाविक्रीचा धंदा करीत असल्याची माहिती मिळाली. जगताप हा मूळचा मोहोळ तालुक्यातील सोहाळे गावचा रहिवासी असून, सध्या तो सोलापुरात राहतो. मोहोळ आणि सोलापूर येथील दोन्ही घरांतून तो गांजाविक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनकणे आणि करिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संजय क्षीरसागर, अल्फाज शेख यांच्या पथकाने मोहोळ आणि सोलापुरात छापा टाकून अजित जगताप यास ताब्यात घेण्यात आले. दोन्ही ठिकाणांहून 15 लाख 50 हजार रुपये किमतीचा 77 किलो गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांनी दिलेल्या फिर्यादीकरुन फौजदार चाकडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहायक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, उपनिरीक्षक अल्फाज शेख, बापू साठे, भारत पाटील, सुभाष मुंढे, सैपन सय्यद, महेश शिंदे, राजू मुद्गल, कुमार शेळके, अनिल जाधक, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, कसिम शेख, महिला पोलीस अंमलदार ज्योती लंगोटे, निलोफर तांबोळी, अकिनाश पाटील, मच्छिंद्र राठोड क प्रकाश गायककाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.