आवडीचे खा, व्यायाम करा

>>मानसी पिंगळे

अभिनय अन् जबरदस्त फॅशन सेन्समुळे पुण्याची टॉकरवडी अमृता देशमुख नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. आज तिच्या फिटनेस फंडाबद्दल जाणून घेऊ या.

अमृता सांगते, दररोज किमान एक तास तरी स्वतःसाठी, शरीरासाठी काढला पाहिजेच. फक्त डाएट किंवा खाण्यापिण्याच्या बंधनांनीच आरोग्य उत्तम राहते हा फार चुकीचा समज आहे. अमृता तिला आवडते ते सगळे खाते, पण न चुकता व्यायाम करते. दररोज चालायला जाणे, नियमित aजिम, जास्तीत जास्त पॅलरीज बर्न करण्यावर लक्ष पेंद्रित करण्याचा तिचा प्रयत्न असतो. शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त राहायचे असेल तर आधी मानसिदृष्टय़ा फिट असणे आवश्यक आहे. शक्यतो बाहेरचे जेवण टाळावे आणि जास्तीत घरच्या जेवणाला प्राधान्य द्यावे. कारण घरच्या जेवणात ते सर्व महत्त्वाचे घटक आहेत जे शरीरासाठी गरजेचे आहेत.

अमृता दररोजच्या आहारात डोसे, डाळींचे धिरडे, थालीपीठ अशा आहारावर भर देते. तिला तिखट, चमचमीत पदार्थांची आवड नाही. एखादवेळेस ठीक आहे. झणझणीत, तेलकट-तुपकट मसालेदार पदार्थ वगळता अमृता हलका आहार घेणे पसंत करते. अमृता सांगते, योग्य असा फिटनेस मेन्टेन करायचा असेल तर खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवत शक्यतो मैदा असलेले पदार्थ टाळावेत. मैद्यामुळे शक्यतो वजन वाढते. त्यामुळे ब्रेड, पिझ्झा, बर्गरसारखे मैद्यापासून बनवले जाणारे पदार्थ कळत-नकळत आपल्या आहारात वारंवार येत असतात. जे वजन वाढण्याचे एकमेव कारण ठरते.

स्ट्रीट फूडमध्ये ती मुंबईतील शेवपुरी, पाणीपुरी पसंत करते, पण स्ट्रीट फूड खाताना ते हायजिनिक आहे की नाही हे मात्र नक्की तपासा असे ती आवर्जून सांगते. पुण्याची मँगो मस्तानी ही ऑल टाइम फेवरेट. त्याचसोबत अमृताला प्रसादच्या आईच्या हातचे चिकन फ्राय प्रचंड आवडते. जितका जास्त व्यायाम तितके शरीर तंदुरुस्त, हे सांगायला ती विसरत नाही.

खान्देशी पदार्थ मस्तच…

अमृताला प्रादेशिक पदार्थ खायला फार आवडतात. साऊथ इंडियन फूडचा बऱयाचदा तिच्या आहारात समावेश असतो. ज्यामध्ये इडली, डोसा हे पौष्टिक आणि पचायला हलके असणारे पदार्थ आहेत. इंदूरला गेली असता तिने तेथील पोहे खाऊन पाहिले जे फार प्रसिद्ध आहेत. ती म्हणते, इंदूरचे पोहे म्हणजे लाजवाब. ज्यांची चव विसरणे अशक्यच. त्याचबरोबर खान्देशी पाककृती ही महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पाककृती म्हणून ओळखली जाते. ज्यात अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेले पदार्थ असतात. जे अमृताला प्रचंड आवडतात. ती स्वतः खान्देशची असल्याकारणाने खान्देशी वरण बट्टी, घोटलेली वांग्याची भाजी, वांग्याचे भरीत तिला प्रचंड आवडते.