ओदिशातील गोपालपूर बंदरही अदानीच्या ताब्यात

लडाखमधील जमिनी मोठमोठय़ा कंपन्यांना विकण्याचा घाट मोदी सरकारने घातल्याचा आरोप लडाखमध्ये 21 दिवसांपासून उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी केला होता. त्यानंतर काही दिवसातच  देशातील आणखी एक महत्वाचे  बंदर अदानी यांनी खरेदी केल्याचे समोर आले आहे. अदानी समूहाने तब्बल 3080 कोटी रुपये मोजून ओदिशातील गोपालपूर पोर्ट  खरेदी केले आहे. त्यामुळे देशभरातील बंदरे, उर्जा प्रकल्प, खाणी, विमानतळे अदानीलाच मिळतील त्यादृष्टीने मोदी सरकारने डावपेच आखल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

शापूरजी पालोनजी समूह आणि अदानी पोर्टस् इकॉनॉमिक झोन लिमिटेड यांच्यात हा करार झाला आहे. गोपालपूर बंदरातील 95 टक्के भाग गौतम अदानी यांनी खरेदी केला आहे. या करारानंतर कंपनीचा शेअर 1.5 टक्क्यांनी वाढला आणि 1281 रुपयांवर बंद झाला. ग्रीनफिल्ड एलएनजी रीगॅसिफिकेशन टर्मिन उभारण्यासाठी बंदराने पेट्रोनेट एलएनजीसह हा करार केला आहे.

n गोपालपूर पोर्टस् लिमिटेड या बंदरावर अनेक प्रकारचे ड्राय बल्क आणि ब्रेक बल्क कार्गे हाताळले जातात. हे एक मल्टीकार्गे पोर्ट आहे. या पोर्टवर लोखंड, कोळसा, चुनखडी, इल्मेनाइट वाळू आणि अॅल्युमिनियमसह कोरडय़ा बल्क कार्गेची वाहतूक होते.दरम्यान 2022-23 या आर्थिक वर्षात बंदराने 7.4 दशलक्ष मेट्रिक टन माल हाताळला.