संगीत दिग्दर्शकाची फसवणूक करणाऱयाला अटक 

का प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाची शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूकप्रकरणी एकाला सायबर पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. हिमांशू नायक असे त्याचे नाव आहे. त्याने त्याचे बँक खाते 50 हजार रुपयांत ठगांना वापरण्यास दिले होते. नायकला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार हे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आहेत. जानेवारी महिन्यात त्यांना एका सोशल साईटवर शेअर ब्रोकिंगबाबत जाहिरात दिसली. त्या जाहिरातीवर क्लिक केल्यावर त्यांना एका ग्रुपमध्ये जोडले गेले. त्या ग्रुपमध्ये शेअर ट्रेडिंगबाबत माहिती अपलोड केली जात होती. अपलोड केलेली माहिती खरी असल्याने त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर त्याने ग्रुप अॅडमिन असलेल्या महिलेला संपर्क केला. तिने एका पंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास कसा नफा मिळेल याची माहिती दिली. रात्री सांगण्यात आलेले शेअर खरेदी करून त्याचे पह्टो ग्रुपवर टाकायचे. त्या शेअरचा भाव वाढल्यावर ते कसे विकायचे हे सांगितले जायचे. त्या व्यवहारासाठी त्यांना पंपनीचे खाते उघडावे लागेल असे सांगितले. खाते उघडण्यासाठी त्यांना एक लिंक दिली. त्या लिंकवर क्लिक केल्यावर एक अॅप्स उघडले. तेथे त्याने आधारकार्डची माहिती अपलोड केली. त्यानंतर त्याने विविध खात्यांत 4 लाख 58 हजार रुपये ट्रान्स्फर केले. गुंतवणूक केलेल्या त्या पैशाच्या मोबदल्यात खूप नफा जमा झाल्याचे दिसले. ते पैसे काढण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पैसे निघत नव्हते. पैशाबाबत त्याने एकाला पह्न केला. तेव्हा दहा दिवसांनंतर पैसे काढा, नाहीतर टॅक्स भरावा लागेल असे त्याना सांगितले. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच त्याने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक गछे, उपनिरीक्षक घोरपडे, संग्राम जाधव, विजय जाधव आदी पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना एक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे तपास पथक मध्य प्रदेश येथे गेले. तेथून पोलिसांनी हिमांशूला ताब्यात घेतले. त्याच्या खात्यात काही रक्कम जमा झाली होती. त्याने 50 हजार रुपये घेऊन त्याचे बँक खाते सायबर ठगांना वापरण्यास दिले होते. त्या पैशातून त्याने मौजमजा केल्याचे समजते. नायकला अटक करून मुंबईत आणले. त्याच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.