लेख – महाराष्ट्र बनणार संरक्षण उत्पादनाचे प्रमुख केंद्र

प्रातिनिधिक

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]

पुण्यामध्ये 24, 25 आणि 26 फेब्रुवारी 2024 रोजी भव्य ‘डिफेन्स एक्सपो’ आयोजित करण्यात आले. त्यामुळे डिफेन्स क्षेत्रातील निर्मितीमध्ये महाराष्ट्राला नवी दिशा मिळेल . पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि संमेलन केंद्राद्वारे या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना त्यांच्या तांत्रिक प्रगतीचं प्रदर्शन करण्यासाठी एक भव्य व्यासपीठ यानिमित्ताने मिळाले. हा एक्स्पो महाराष्ट्राला संरक्षण उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून पुढे नेणारा ठरणार आहे.

संरक्षण दलास लागणाऱया साधनसामग्रीपैकी तब्बल 70 टक्के उत्पादने 2014च्या आधी परदेशी होती, ती आता 30 टक्के झाली आहे. आज जगातील उत्तम शस्त्रसामग्री देशात निर्माण होत आहे. त्यामुळे देशाचे लाखो कोटी रुपये वाचले आहेत आणि आपली वाटचाल आत्मनिर्भरतेकडे सुरू आहे. आता तर भारताच्या संरक्षण निर्यातीने उच्चांक गाठला आहे, आर्थिक वर्ष 2013-14 मध्ये 686 कोटी ते आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 16 हजार कोटी. ही उल्लेखनीय 23 पट वाढ जागतिक संरक्षण उत्पादन क्षेत्रातील भारताची प्रगती दर्शविते.

आज भारत अनेक शस्त्रास्त्रs स्वदेशी बनावटीची वापरतो. स्वदेशी तंत्रज्ञान ही संकल्पना संरक्षण क्षेत्रात आणल्यानंतर मोठय़ा प्रमाणात संरक्षण उत्पादने तयार करणाऱया एमएसएमई देशात तयार झाल्या आहेत. विशेष म्हणजे संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी राज्यातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना सक्षम करणारा महाराष्ट्रातील हा पहिलाच डिफेन्स एक्स्पो होता. संरक्षण उत्पादन क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रावीण्य असणाऱया उद्योगातील समन्वयाला चालना देण्याच्या उद्देशाने वायुसेना, नौसेना आणि स्थलसेना या तीनही सुरक्षा दलांचा यात महत्त्वाचा सहभाग होता. या एक्स्पोमध्ये एक हजारहून अधिक सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग, स्टार्टअप आणि 20 हजारांहुन अधिक अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ज्ञान आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण केली. यात एल अॅण्ड टी, महिंद्रा, टाटा, डीआरडीओ आणि संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक क्षेत्रातील पंपन्या-पीएसयू यांसह विविध प्रतिष्ठत उद्योगातील तज्ञ होते.

सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग डिफेन्स एक्स्पो हे एक अभूतपूर्व प्रदर्शन होते. या क्षेत्रातील नवकल्पना आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासोबतच संरक्षण क्षेत्रातील प्रमुख खरेदीदार म्हणजे तीनही सैन्यदल आणि विव्रेता यांच्यातील संपर्क वाढवणे, महाराष्ट्रातील डिफेन्स एमएसएमईची तयार झालेली इकोसिस्टीम अधिक बळकट करण्यासोबतच संरक्षण क्षेत्रातील खरेदीदारांसाठी अर्थपूर्ण संवाद निर्माण करणे, यासोबतच व्यवसायाच्या परस्पर फायदेशीर संधी ओळखण्यासाठी ‘डायनॅमिक पह्रमची’ स्थापना करणे, संरक्षण उत्पादन क्षेत्रात नावीन्यपूर्ण उद्योजकतेची संस्कृती जोपासणे, अत्याधुनिक उपायांच्या विकासास प्रेरणा व प्रोत्साहन देणे, धोरणात्मक उपक्रम राबवून शाश्वत आणि मजबूत वाढीसाठी आवश्यक सहाय्य प्रदान करून महाराष्ट्रातील एमएसएमई क्षेत्राच्या विस्तारासाठी सक्रियपणे योगदान देणे, महत्त्वाच्या क्षेत्रातील एमएसएमईसाठी अनुकूल संधी निर्माण करून खरेदीदार आणि विव्रेते यांच्यातील संपर्क मजबूत करणे हे या एक्स्पोमागील महत्त्वाचे उद्देश होते.

तसेच महाराष्ट्रात एमएसएमई जाळ्यासाठी एक मजबूत आणि टिकाऊ पुरवठा साखळी फाऊंडेशनची स्थापना करणे, संरक्षण उत्पादन आणि निर्यातीसाठी मार्ग मोकळा करणे, शैक्षणिक-उद्योग सहकार्याच्या प्रगतीद्वारे राज्य आणि राष्ट्रासाठी एक शक्तिशाली परिसंस्था उत्प्रेरित करणे हासुद्धा या प्रदर्शनाचा उद्देश होता.

‘डिफेन्स एक्स्पो 24’ या संरक्षण सामग्रीविषयक प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 5 लाखांहून अधिक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली.

महाराष्ट्राने 2017 मध्ये एअरोस्पेस आणि डिफेन्स धोरण तयार केले आणि या क्षेत्राला चालना देण्यासाठी 1 हजार कोटीचा निधी उभा केला. त्यातून 600 ‘एमएसएमई’ (सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग) तयार झाल्या आहेत. केवळ 300 कोटीतून 12 ते 15 हजार कोटींचे मूल्य या उद्योग संस्थांनी तयार केले. विमान आणि युद्धनौकेसाठी लागणारा 30 टक्के दारूगोळा भारतात तयार होत आहे.

पुणे हे भारताच्या सामरिक शक्तीच्या दृष्टीने महत्त्वाचे पेंद्र आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्र देशात अग्रणी आहे. देशाच्या वायुसेनेचे मेंटेनन्स कमांड, लष्कराचे दक्षिण कमांड, नौदलाचे वेस्टर्न कमांड, मुंबई डॉकयार्ड महाराष्ट्रात आहे. नाशिकमध्ये हिंदुस्थान एअरोनॉटिकल्समध्ये ‘तेजस’ आणि ‘सुखोई’ अशी लढाऊ विमाने तयार होतात. माझगाव डॉकमध्ये जहाज बांधणीची आधुनिक व्यवस्था आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्ससारखी संरक्षण क्षेत्रात उच्च तंत्रज्ञानयुक्त काम करणारी यंत्रणा आपल्याकडे आहे.

नव्या शैक्षणिक धोरणात उद्योगांची गरज ओळखून अभ्यासक्रम विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या ‘एमएसएमई’ने संरक्षण क्षेत्रात ठसा उमटवला आहे. भविष्यात नागपूर, शिर्डी, पुणे आणि रत्नागिरी ‘डिफेन्स क्लस्टर’ निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात येईल. संरक्षण क्षेत्रातील उद्योगांच्या मागणीप्रमाणे एक हजार एकर जागा उपलब्ध करून देण्यात येईल.

हवाई दलाकडून प्रदर्शनात ‘आकाश’ आणि ‘समर’ क्षेपणास्त्र प्रणाली, याशिवाय नवीन पिढीचे कमी वजनाचे प्रगत हेलिकॉप्टर एमके-चार, कमी वजनाचे लढाऊ हेलिकॉप्टर मांडण्यात आले. तरुणांना भारतीय वायुसेनेकडे आकर्षित करण्याकरिता विविध स्टॉलही उभारले होते.

देशाची अर्थव्यवस्था, औद्योगिक विकास, निर्यात आणि थेट परदेशी गुंतवणूकविषयक आकर्षकता वाढवणे यात महत्त्वाचे योगदान देणारे महाराष्ट्र राज्य आहे. संरक्षण क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला परवानगी मिळाल्यानंतर महाराष्ट्र हे संरक्षण क्षेत्राशी संबंधित साहित्याच्या उत्पादनासाठी धोरण निश्चित करणारे देशातील पहिले राज्य होते.

महाराष्ट्राने हवाई उड्डाण तसेच संरक्षणविषयक उत्पादनाला प्रोत्साहन योजनेतील पॅकेजमधील महत्त्वाचे विषय म्हणूनदेखील घोषित केले. या प्रयत्नांचा परिणाम म्हणून देशातील विमाने, जहाजे आणि बोटी यांच्या निर्मितीमध्ये 20 टक्क्यांहून अधिक तसेच देशात उत्पादन होत असलेल्या शस्त्रास्त्रs आणि दारूगोळ्याच्या एकूण साठय़ापैकी 30 टक्के साठय़ाच्या निर्मितीचे योगदान एकटे महाराष्ट्र राज्य देत आहे. ही आकडेवारी संरक्षण क्षेत्रातील उद्योगांना चालना देण्यासंदर्भात या राज्याची धोरणात्मक दृष्टी दर्शविते. हीच स्थिती संरक्षण शस्त्रास्त्रs व साहित्य खरेदीबाबतही आहे. महाराष्ट्रातील स्टार्टअप पंपन्यांद्वारे तयार केले जाणारे काही भविष्यकालीन स्वदेशी तंत्रज्ञान हे संरक्षण तंत्रज्ञान क्रांतीचे पुढचे पाऊल ठरणार आहे, पुणे तंत्रज्ञानाची राजधानी आहे. अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग’ ही मोठी संधी आहे.