विज्ञान-रंजन – स्वनातीत वेगाने…

>> विनायक

स्वनातीत म्हणजे सुपरसॉनिक, म्हणजे ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेग असलेली गोष्ट. सुपरसॉनिक म्हणजे आवाजाच्या वेगापेक्षाही जास्त. प्रकाशाचा वेग सेकंदाला 3 लाख किलोमीटर असतो त्या तुलनेत, कोरड्या हवेत आणि 20 अंश सेल्सिअस तापमानात ध्वनीचा वेग सेकंदाला 1192 किलोमीटर म्हणजे खूपच कमी आहे. प्रकाशाच्या वेगाने प्रवास करणं केवळ अशक्य, परंतु ध्वनीपेक्षा अधिक वेगाने मात्र एखादं विमान जाऊ शकतं, सुपरसॉनिक वेग सेकंदाला 1236 किलोमीटर भरतो.

कॉन्कॉर्ड-001 आणि 002 या नावाचं सुपरसॉनिक प्रवासी विमान जगाने 27 वर्षे अनुभवलं. योगायोगाने, आपण गेल्या दोन लेखात ज्याविषयी वाचलं त्या ‘झॅपेलिन’ बलून विमानांचा अभिनव प्रयोगही 27 वर्षंच यशस्वीरीत्या चालला होता. एका भयंकर अपघातानंतर तो थांबवण्यात आला. कॉन्कॉर्ड विमानांचीही तीच गत झाली.

मात्र ज्या वेळी आवाजापेक्षा अधिक वेगाने उडणारं हे विमान अवतरलं तेव्हा त्याचं इतपं कुतूहल आणि काwतुक झालं की, 1971 मध्ये आमच्या कॉलेजच्या पुस्तकात ‘कॉन्कॉर्ड’वर एक धडा होता! ते विमान मुंबईत अपवादात्मकच आलं. चार्टर्ड फ्लाइट म्हणून आलेलं गरुडासारख्या बाकदार नाकाचं (डपी नोज) आणि ‘टेललेस’ किंवा शेपूटविहीन समजलं जाणारं देखणं कॉन्कॉर्ड, मुंबईच्या विमानतळावर उतरण्यापूर्वी आकाशात पाहिल्याचं आठवतं. त्यावेळी त्याचा वेग फारच कमी होता. कारण ध्वनीपेक्षा जास्त वेगाने ते एखाद्या वस्तीच्या जवळून जाऊ लागलं तर खिडक्यांची तावदानं हादरायची आणि काचाही काही वेळा फुटायच्या. शिवाय त्याचा वेग कर्णकटू किंवा कानठळ्या बसवणारा आवाज करायचा. त्यामुळे त्याचा ‘सुपरसॉनिक’ वेग त्याला समुद्रावरून प्रवास करतानाच धारण करता यायचा.

ताशी 2179 किलोमीटर वेगाने उडणारे कॉन्कॉर्ड हे फ्रान्स आणि इंग्लंड या दोन देशांची संयुक्त निर्मिती होती. म्हणून त्याचं नाव ‘एकता’ (कॉन्कॉर्ड) असं ठेवलं. लंडन-पॅरिस-न्यूयॉर्क हा त्या काळी सुमारे 8 तासांचा असलेला प्रवास कॉन्कॉर्डमुळे अवघ्या तीन तासांत व्हायचा. मोठे उद्योगपती पिंवा अधिकारी सकाळी लंडन ते न्यूयॉर्क असा प्रवास करून संध्याकाळी घरी परत येऊ शकत. आपल्या मुंबई-पुणे प्रवासाइतकाच वेळ घेणारा हा प्रवास सुखकर होताच, परंतु तितकाच महागडाही होता. त्या काळात या प्रवासासाठी 10 हजार पाऊंडचं तिकीट असायचं. त्यामुळे ही श्रीमंती चैनच होती. विज्ञानाच्या दृष्टीने त्याचं ‘सुपरसॉनिक’ असणं महत्त्वाचं होतं.

स्वनातीत किंवा सुपरसॉनिक विमान असावं याची चर्चा आणि प्रयोग 1954 पासून सुरू झाले. राष्ट्राराष्ट्रातील वाढत्या संपका&मुळे जग अधिक ‘जवळ’ आणण्याचे प्रयत्न आजही सुरू आहेतच. त्याचा आरंभ सुपरसॉनिक विमानांनी केला. 1962 पर्यंत हे विमान तयार झालं. त्याची प्रायोगिक उड्डाणं होऊ लागली. प्रवाशांना त्यातून न्यायचं तर सुरक्षेची हमी ही सर्वात मोठी गोष्ट होती. 593-टर्बो जेट इंजिन असणारं आणि ‘रिहीट’ तंत्रज्ञानातून इंधनबचत करत वेग कायम ठेवणारं हे यान खर्चिक होतं. त्याचं वारेमाप ‘तिकीट’ परवडणारे प्रवासी मिळवण्याचे तर ते तितपंच ‘पॉश’ असणंही गरजेचं होतं. या सर्व गोष्टींची पूर्तता करत आधी लंडन-पॅरिस आणि नंतर अॅटलांटिक समुद्र ओलांडून अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरापर्यंत या प्रवासाची व्याप्ती वाढवण्यात आली. युरोपमध्ये हा प्रयोग झाल्यावर रशियानेही टय़ुपोलेन-144 हे स्वनातीत विमान 1978 मध्ये आणलं.

1965 नंतर ‘कॉन्कॉर्ड’च्या प्रवासाला खऱया अर्थाने वेग आला. प्रवाशांचा भरपूर प्रतिसाद लाभला. 92 ते 128 प्रवासी नेण्याची क्षमता असलेली ही विमानं ब्रिटन आणि फ्रान्स या देशांचं भूषण ठरली. त्याचा एकमेव तोटा म्हणजे ते ज्या भूभागावरून उडेल तिथे प्रचंड ‘सॉनिक-बूम’ आवाज उमटायचा. एरवीच्या विमानांची घरघरही कशी नकोशी होते हे अनुभवलेल्यांना हा आवाज त्रासदायक वाटणं साहजिकच होतं. त्यामुळे जास्त वेळ समुद्रावरूनच उड्डाण घडेल अशाच ‘फ्लाइट’ कॉन्कॉर्ड करून शकत होतं.

एकेकाळच्या ‘झॅपेलिन’प्रमाणेच अत्याधुनिक कॉन्कॉर्डचंही सारं व्यवस्थित चाललं होतं. सुमारे 50 हजार उड्डाणांचा विक्रम त्याच्या खात्यावर जमा झाला होता. 25 लाख प्रवासी ‘कॉन्कार्ड’मधून फिरले होते… आणि 25 जुलै 2000 रोजी तो उत्पात घडला. पॅरिसहून सुटलेल्या ‘कॉन्कॉर्ड’च्या टायरमध्ये (आधी उडालेल्या एका विमानाची) धातूची ‘रन-वे’वर पडलेली पट्टी घुसली आणि गॉनेसी गावाजवळ असताना कॉन्कॉर्ड न्यूयॉर्कच्या वाटेवर असताना कोसळलं. 109 प्रवासी त्यावेळी त्यात होते.

हा धक्का पचवणं ‘कॉन्कॉर्ड’ प्रकल्पाला कठीण गेलं. प्रवासी उड्डाणं थांबवावी लागली कारण लोकांमध्ये भीतीची लहर पसरली. 27 वर्षांनी ‘कॉन्कॉर्ड’ने पूर्णविराम घेतला. उड्डाणाच्या दृष्टीने इतिहासजमा झालेली अशी 20 पैकी 16 विमानं सध्या लंडन, बार्गेट आणि न्यूयॉर्कच्या म्युझियममध्ये विसावा घेत आहेत.