सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात दाणादाण; सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला

इराण- इस्रायलमधील तणावाचा परिणाम जागावर होत आहे. दोन्ही देशातील युद्धसदृश्य परिस्थितीमुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. आता मंगळवारी दुसरी दिवशीही बाजारावर या परिस्थितीचा परिणाम दिसत असून सलग दुसऱ्या दिवशीही बाजारात दाणादाण उडली असून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सुमारे 500 तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक सुमारे 140 अंकांनी घसरला आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 500 अंकांच्या घसरणीसह 72906 अंकांवर सुरू झाला. तर तर निफ्टीचा निर्देशांक 140 अंकांच्या घसरणीसह 22135 अंकांवर सुरू झाला. बाजाराच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावरही बाजारात घसरण सुरूच होती. अस्थिर जागतिक वातावरणामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून गुंतवणूक काढून घेण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे विक्री सुरू असल्याने बाजारात घसरण होत आहे.

मंगळवारी दुसऱ्या दिवशी एलटीआय, माईंडट्री, टीसीएस, इन्फोसिस, टीसीएस, कोटक बँक, बजाज फायनान्स, एनटीपीसी आणि इंडसइंड बँके या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारासह आशियाच्या शेअर बाजारातही घसरण दिसून येत आहे.