निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर तृणमूलचे धरणे आंदोलन

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण तापू लागलं आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेसने दिल्लीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन सुरू केलं आहे. सरकार केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. तसंच, केंद्रीय यंत्रणांचे प्रमुख बदलण्याची मागणी तृणमूलने केली आहे.

तृणमूलचे खासदार निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर 24 तास आंदोलन सुरू केलं आहे. दरम्यान, पोलिसांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांना तिथून हटवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या दरम्यान, खासदार आणि पोलिसांमध्ये झटापटही झालेली पाहायला मिळाली.