कॅनव्हासवरील फुले

तन्वी पाठारे यांच्या चित्रांचे प्रदर्शन

फ्लोरेन्सस्थित हिंदुस्थानी चित्रकार तन्वी पाठारे यांचे फुलांवरील विशेष प्रदर्शन सध्या काळाघोडा येथील जहांगीर आर्ट गॅलरीत सुरू आहे.

चित्रकार तन्वी पाठारे या सध्या इटलीच्या फ्लोरेन्स अकादमी ऑफ आर्टसमध्ये शिकवतात. फ्लोरेन्समधील स्वतःच्या स्टुडिओमध्येही काम करत आहेत. त्यांनी 2012 मध्ये इटलीच्या फ्लोरेन्स अकादमी ऑफ आर्टसच्या चित्रकला शाखेमधून पदवी प्राप्त केली असून सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमधून त्यांनी कलाशिक्षण घेतले आहे.

निसर्ग आणि रंगावरील प्रेमाने प्रेरित होऊन फुलांची आणि निसर्गाची केलेली तैलचित्रे तसेच काही व्यक्तिचित्रे ‘ब्लूम’ प्रदर्शनात सादर केली आहेत. ही सर्व चित्रे त्यांनी फ्लॉरेन्समधील त्यांच्या स्टुडिओमध्ये किंवा शहराच्या आसपासच्या परिसरातून रेखाटलेली आहेत. प्रदर्शन 12 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 11 ते 7 या वेळेत पाहता येईल.