IPL 2024 : चेपॉकवर किंग चेन्नईच, गुजरातचा 63 धावांनी उडवला धुव्वा

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये रंगलेल्या सामन्यात चेन्नईने गुजरातचा 63 धावांनी पराभव केला. या विजयासह चेन्नईने चेपॉकवर सर्वाधिक 47 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. घरच्या मैदनावर चेन्नईच किंग असल्याचे चेन्नईने पुन्हा एकदा दाखवून दिले.

गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईने गुजरातच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत 207 धावांचा डोंगर उभा केला. रचिन (46) आणि ऋतुराज (46) यांनी आक्रमक फलंदाजी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर आलेल्या अजिंक्यला (12) मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अजिंक्य नंतर शिवम दुबे नावाच वादळ चेपॉकच्या मैदनावार गोंगावल. त्याने ताबडतोब फलंदाजी करत 5 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 23 चेडूंमध्ये 51 धावा कुटल्या. शिवम दुबेच्या फटकेबाजीमुळे चेन्नईने गुजरातला विजयासाठी 207 धावांचे लक्ष दिले होते.

प्रत्युत्तरात लक्षाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या गुजरातची सुरुवात खराब झाली. साहा (21), कर्णधार शुबमन गिल (08) त्यानंतर आलेल्या साई सुदर्शनने (37) डाव सावरण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर मात्र कोणत्याच खेळाडूला चांगली खेळी साकारता आली नाही. चेन्नईकडून दिपक चहर, मुस्तफिजूर रेहमान आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. यांना मिचेल आणि पथिराना यांनी चांगली साथ दिली त्यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या. प्रथम फलंदाजाची फटकेबाजी आणि नंतर गोलंदाजांची केलेल्या आक्रमक माऱ्यामुळे गुजरातचा संघ ढासळला आणि 63 धावांनी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.