Israel Vs Hamas War- जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठे संकट कोसळणार; जागतिक बँकेचा धोक्याचा इशारा

इस्रायल- हमास युद्धाची व्याप्ती आणि तीव्रता वेगाने वाढत आहे. हे युद्ध दीर्घकाळ सुरू राहण्याची शक्यता असल्याने जागतिक बँकेने या पार्श्वभूमीवर धोक्याचा इशारा दिला आहे. हे युद्ध दीर्घकाळ सुरू राहिल्यास जागतिक अर्थव्यवस्थेवर त्यांचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असे जागतिक बँकेने म्हटले आहे. या युद्धाचा सर्वाधिक फटका कमोडिटी सेक्टरला बसणार असल्याचेही जागतिक बँकेने स्पष्ट केले आहे. या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होणार आहे. त्यामुळे जगभरात सर्वत्र महागाई वाढण्याचा इशारा जागतिक बँकेने दिला आहे.

या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती 150 डॉलर प्रतिबॅरेलपर्यंत वाढण्याची शक्याता आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यास उर्जा आणि इतर उत्पादनांच्या किंमतीतही वाढ होत सर्वत्र महागाई वाढणार आहे. रशिया- युक्रेन युद्धातही जगाला या समस्येचा सामना करावा लागला होता. आता हे युद्ध शांत होदत असतानाच इस्रायल हमास युद्धाचा भडका उडाला आहे.

आतापर्यंत युद्ध सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हे युद्ध आणखी काही काळ सुरू राहिल्यास कच्च्या तेलाच्या पुरवठा प्रतिदिन 6 मिलियन ते 8 मिलियने कमी होऊ शकतो. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमता 140 डॉलर प्रतिबॅरेल ते 157 डॉलर प्रतिबॅळरपर्यंत जाऊ शकतात. याचा सर्वाधिक फटका कमोडिटी बाजाराला बसण्याची शक्यता आहे. 1970 मध्येही कमोडिटी बाजाराला बसलेल्या फटक्यानंतर रशिया- युक्रेन युद्धातून बाजारा सावरत असताना पुन्हा मोठे संकट येण्याची शक्यता जागतिक बँकेने वर्तवली आहे.