झीनतला मुमताजने सुनावले; तुझं लग्न तर नरक होतं…

 

ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर लिव्ह-इन रिलेशनशिपचा सल्ला दिला होता. झीनत यांनी म्हटले होते की,  तरुणांनी लग्नाआधी एकत्र राहून म्हणजेच लिव्ह इन रिलेशनमध्ये   एकमेकांना समजून घ्यायला हवे आणि घट्ट नाते निर्माण करायला हवे. झीनत यांच्या या पोस्टवर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी आपली मते मांडली. अशातच ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांनी या  वक्तव्याचा विरोध करत झीनतला चांगलेच सुनावले.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मुमताज म्हणाल्या, लग्न सांभाळावे लागते. निभवावे लागते. मुलींनी लिव्ह इनसाठी होकार दिला तर लग्नसंस्थाच नष्ट होईल. मला प्रामाणिकपणे सांगा तुम्ही तुमच्या मुलाचे लग्न अशा मुलीशी लावून द्याल का, जी आधी ‘लिव्ह इन’मध्ये राहिली आहे? तुम्ही झीनतचे उदाहरण घ्या. ती मजहर खानला लग्नाच्या आधीपासून ओळखत होती. तरीही तिचे लग्न नरक झाले होते. ती नात्यांवर सल्ले देणारी शेवटची व्यक्ती असली पाहिजे.

मुमताज पुढे म्हणाल्या, झीनतने सोशल मीडियावर अशी वक्तव्ये करण्याआधी विचार केला पाहिजे. कूल आंटी बनण्याच्या नादात आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी असे कोणतीही सल्ले तिने देऊ नयेत, असे म्हणत मुमताज यांनी झीनतच्या वक्तव्याचा विरोध केला.