मुस्लिम तरुणांना व्हायचंय आयएएस, आयपीएस अधिकारी  

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यात मुस्लिम तरुण कुठेतरी मागे राहत होता. गेल्या आठ ते दहा वर्षात हे चित्र बदलले असून मुस्लिम तरुणांमध्ये आयएएस, आयपीएस अधिकारी होण्याची व्रेझ वाढतेय.  नुकत्याच जाहीर झालेल्या यूपीएससीच्या निकालात 1016 उमेदवार यशस्वी झाले असून यात 52 मुस्लिम युवक आहेत. यातील रुहानी, नौशीन, वारदाह खान, जुफिशान हक आणि फैबी राशिद या मुस्लिम युवकांनी टॉप 100 मध्ये स्थान पटकावले. यातील नौशीनने नववा रॅंक मिळवला.

गेल्या काही वर्षातील यूपीएससी परिक्षेत यशस्वी झालेल्या मुस्लिम युवकांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, 2012 मध्ये 30, 2013 मध्ये 34, 2014 मध्ये 38 तर 2015 मध्ये 36 उमेदवारांनी यश मिळवले होते.

2022 मध्ये यूपीएससी परीक्षेत 933 उमेदवार यशस्वी झाले होते त्यात 29 यशस्वी उमेदवार मुस्लिम कम्युनिटीमधील होते.