चार महिन्यांच्या नातवाला 240 कोटींचे गिफ्ट

इन्पहसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी आपल्या चार महिन्यांचा नातू एकाग्र रोहन मूर्ती याला 240 कोटी रुपयांचे शेअर्स भेट म्हणून दिले आहेत. एक्सचेंज फाइलिंगनुसार, देशातील सर्वात मोठय़ा टेक कंपनीमध्ये एकाग्र रोहन मूर्तीची 15 लाख शेअर्सची भागीदारी आहे. नातवाला शेअर भेट म्हणून दिल्यानंतर इन्फोसिसमध्ये नारायण मूर्ती यांची भागीदारी 0.40 टक्के कमी होऊन 0.36 टक्के राहिली आहे. आता त्यांच्याकडे पंपनीचे जवळपास 1.51 कोटी शेअर शिल्लक आहेत. ही देवाणघेवाण ऑफ मार्पेटनुसार करण्यात आली आहे.

एकाग्र हा रोहन मूर्ती आणि त्यांची पत्नी अपर्णा कृष्णन यांचा मुलगा आहे. त्याचा जन्म गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झाला.
नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती हे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे सासू-सासरे आहेत.
नारायण मूर्ती यांनी 1981 मध्ये इन्फोसिसची स्थापना केली होती. इन्फोसिस कंपनी आघाडीतील कंपन्यांपैकी एक आहे.