आरक्षण देता येत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; संजय राऊत यांनी ठणकावले

राज्याचे मुख्यमंत्री व दोन दोन उपमुख्यमंत्री निर्दयीपणे राज्य करत आहे, असा आरोप शिवसेना ( उद्धव बाळासहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. महाराष्ट्रातील सरकार हे बेकायदेशीर सरकार आहे . हे सरकार दिल्लीमध्ये पायघड्या घालतात, सरकार टिकवण्यासाठी तोडगा काढायचा म्हणून ते  दिलीत गेले. मात्र दुसरीकडे मराठा समाज आज आरक्षण मागतो तेथे तुम्हाला तोडगा सापडत नाही, अशी घणाघाती  टीकाही त्यांनी केली. जर यांना आरक्षण देता येत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा सिंचन घोटाळ्याचा विषय सर्वत्र सांगितला व त्याच घोटाळ्यातील मंत्री महाराष्ट्र मध्ये यांच्याबरोबरने शपथ घेतात असे राऊत यांनी सांगून आगामी काळामध्ये आपल्याला आता महाविकास आघाडीची सत्ता आणायची आहे व देशांमध्ये इंडियाची सत्ता आणायची आहे त्यासाठी एकजूट दाखवा असे आव्हान त्यांनी केले.
शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज काष्टी या ठिकाणी झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी,जिल्हा प्रमुख प्रमोद लबडे, उपजिल्हाप्रमुख भगवान फुलसौंदर, उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले,तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, तालुकाप्रमुख बाळासाहेब दूतारे, नगर शहर प्रमुख संभाजी कदम नगरसेवक दत्ता कावरे, संतोष गेनप्पा, श्रीगोंदा शहर प्रमुख संतोष खेतमाळीस, अंबादास पाचपुते, सुरेश देशमुख, काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे, टिळक भोस, सुनंदाताई पाचपुते, आदि सह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
खासदार संजय राऊत म्हणाले की, सध्या देशाचे व राज्याचे राजकारण हे अतिशय गढूळ झालेले आहे. जो सरकारला प्रश्न विचारेल, अन्याबाबत आवाज उठवेल अशांना तुरुंग टाकण्याचा उद्योग हे सरकार करत आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली. आम्ही यांच्या त्रासाला घाबरत नाही आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून आता रान पेटवत आहोत, मला अटक पण झाली पण आम्ही त्याला घाबरत नाही असे त्यांनी सांगून आम्हाला पुन्हा भगवा फडकवायचा आहे. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी जो शिवसेना प्रमुखांनी आम्हाला विचार दिला तो विचार घेऊन आम्ही आता आगामी काळामध्ये वाटचाल सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.मागील अडीच वर्षांमध्ये महाविकास आघाडीचे सरकार या राज्यामध्ये होते मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी अतिशय चांगले काम त्यावेळी पाहिले व पहिल्या पाच मध्ये त्यांची देशामध्ये गिनती झाली, त्यांचं गौरव झाला हा महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची बाब आहे असे खासदार राऊत यांनी सांगून ज्यावेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला याच भाजपाने पाठीमध्ये खंजिर खूपसला व सरकार पाडले व भाजपाने या ठिकाणी सत्ता मिळवली  असे ते म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली नसती तर मराठी माणसांचे काय झाले असते हे दिसून आले असते, जात-पात ,धर्म न पाहता मराठी माणूस हा टिकला पाहिजे व त्याचे न्याय हक्कासाठी त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. शिवसेनेची स्थापना झाली नसती तर मुंबईसह मराठी माणसाला भांडी घासावी लागली असती असे राऊत म्हणाले. महाराष्ट्र मध्ये जी जनता जगत आहे ती एकनाथ शिंदे मुळे नाही तर बाळासाहेब मुळे असेही ते म्हणाले. शिवसेनेमुळे आम्ही घडलो आमची पिढी शिवसेनेच्या माध्यमातून घडली. मुंबई ,ठाणे या ठिकाणी शिवसेना ही जिवंत राहिली ती बाळासाहेबांमुळेच आज 24 तास शाखा या ठिकाणी सुरू आहे, सामान्य जनतेची कामे करण्यासाठी त्या शाखा उघडल्या आहेत व त्यातून जनतेची कार्य सुरू असल्याचे राऊत म्हणाले. शिवसेनेचे 40 आमदार पळून गेले पण शिवसेनेचा शिवसैनिक मात्र त्या ठिकाणीच आजही राहिला बाळासाहेबांवर असलेली निष्ठा व पक्षावर असलेली श्रद्धा हे त्याचे प्रतीक आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आपल्याला आता पुन्हा लोकसभा विधानसभेमध्ये सत्ता आणायचे आहे असे ते म्हणाले.
राज्यातील सरकार हे बेकायदेशीर सरकार आहे सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला बेकायदेशीर ठरविले आहे, एवढे होऊन देखील सुद्धा हे निर्लज्जासारखे या खुर्चीवर बसलेले आहे, त्यावेळी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी हे त्यांचे एजंट म्हणून बसले होते असा आरोप  त्यांनी यावेळी केला.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून अपात्र झाले तर आम्ही त्यांना विधान परिषदेमध्ये घेऊ व मुख्यमंत्री करू असा तोडगा हे दिल्लीमध्ये जाऊन त्यांनी केला पण दुसरीकडे जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आंदोलनासाठी उपोषणाला बसलेले आहेत यावर मात्र यांना तोडगा सापडला नाही अशी टीका त्यांनी आता या बेकायदेशीर सरकारला हकाळण्याची वेळ आली आहे असे ते म्हणाले.
खासदार राऊत म्हणाले की, शिवसेनेमध्ये 25 वर्ष घासले तरीही एखाद्याला पद मिळत नाही, नारायण राणेंना मुख्यमंत्री झाल्यानंतर नेतेपद मिळालं असं त्यांनी सांगून, शिंदे यांना सुद्धा नंतर नेतेपद मिळालं असे ते म्हणाले .शिवसेनेमध्ये तोलून मापून पदे दिली जातात, त्यांनाच ती पदे दिले जातात येथे पद देताना साजन पाचपुते यांचा मूळचा पिंड हा शिवसेनेचाच आहे असे आम्हाला जाणवले असे सांगून त्यामुळेच शिवसेनेने आता नव्या लोकांना युवकांना अशा प्रकारची पदे देण्याचा निर्णय घेतला व या पदाच्या माध्यमातून ते आता चांगल्या पद्धतीने काम करतील असे ते म्हणाले.
संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे म्हणाले की, राऊत साहेबांची सूक्ष्म नजरेने साजन  पाचपुते शिवसेनेमध्ये आले ,जिल्ह्यात त्यांचे काम चांगलं सुरू होईल त्यांनी केलेले पक्ष कार्यालयाचे उद्घाटन हे जनतेसाठी ज्ञान मंदिर आहे असे आमदार सुनील शिंदे यांनी सांगितले,
माझी महापौर भगवान फुलसौंदर म्हणाले की, शिवसेना पक्ष बांधणीसाठी साजन पाचपुते हे निश्चितपणे काम करतील, हा हिरा संजय राऊत यांनी शोधला असून पक्ष वाढीस मोठी मदत त्यांची होणार आहे त्यांनी जनतेशी मदत करावी व शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी पक्षाचा सुद्धा विस्तार करावा असे म्हणून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी सुनंदाताई पाचपुते म्हणाले की, श्रीगोंदा येथील जनतेने आमच्या कुटुंबावर प्रेम केलेले आहे आज या ठिकाणी येथील जनता आमच्या पाठीशी असल्याचे पुन्हा दाखवून दिलेले आहे असे म्हणून त्यांनी आलेल्या सर्वांचे आभार मानले.
उपनेते साजन पाचपुते म्हणाले ,सदाअण्णा पाचपुते होते,  श्रीगोंदाचा कारभार करायचे त्या वेळेला ते सर्वसामान्य न्याय द्यायचे त्याचप्रमाणे आता तुम्ही सुद्धा कामाला लागा व त्याप्रमाणे कामकाज करा असे ते म्हणाले. माझ्या वडिलांचा आशीर्वाद असल्यामुळे मी सरपंच झालो असे उपनेते साजन पाचपुते यांनी म्हणले आहे. मी वडिलांचे कार्य पाहिले व आता आपल्याला सुद्धा राजकारणामध्ये जावे लागेल म्हणून मी आता शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. खासदार संजय राऊत यांनी जेलमध्ये जाऊन क्रांती केली आता आपण सुद्धा आता काहीतरी केलं पाहिजे ही खुणगाट मनामध्ये मानली व त्याप्रमाणे कामकाजाला सुरुवात केली असल्याचे पाचपुते म्हणाले. मला उपनेतेपद माहित नव्हतं मात्र मला जो विश्व दिला आहे त्या विश्वासाला पात्र राहून मी कामकाज करेल. माझ्या वडिलांनी माणसं जोडले त्याच पद्धतीने मी माझ काम करेन  निश्चितपणे पक्षाचा काम हे पुढे नाही असे ते म्हणाले.
येथे भाजपाच्या आमदाराकडून एक रुपयाची सुद्धा मदत मिळत नाही भाजपाचे खासदार यांनी केवळ कचरा घंटागाडी दिली, ती पण टमटम सारखी दिली असे साजन पाचपुते यांनी सांगितले त्यावर खासदार संजय राऊत यांनी मी माझ्या परीने तुम्हाला निश्चितपणे निधी देईल असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये विजय दारकुंडे अध्यक्ष घुटेवाडी सोसायटी, किरण कुरुमकर निपणगाव, किरण भोस,तसेच  संजय आव्हाड हसन शेख यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झाला.
राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय अतिशय महत्त्वाचा असून केंद्रामध्ये जे 10 वर्षांपासून सत्तेत बसले आहेत, त्यांनी हा विषय योग्य पद्धतीने हाताळला पाहिजे. त्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवले पाहिजे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केली. राज्य सरकार निवडणुका घ्यायला घाबरत आहे. हे डरपोक व षंढ सरकार आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजप आणि मिंधे सरकारवर हल्लाबोल केला. राजीनाम्यांचे ढोंग करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असेही त्यांना ठणकावले.

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते साजन पाचपुते यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. त्यानंतर खासदार संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार सुनील शिंदे, उपनेते साजन पासपुते आधी यावेळी उपस्थित होते. खासदार संजय राऊत म्हणाले की, मराठा आरक्षणाचा विषय सध्या राज्यभर सुरू आहे. केंद्र सरकार सत्तेमध्ये आहेत ते 10 वर्षापासून आहे. त्यांनी या विषयाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवले पाहिजे व यातून जे काही विषय चर्चेतून येईल त्यातून त्यांनी हा प्रश्न सोडवला पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी, आदिवासी यांच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, असेही संजय राऊत म्हणाले. मनोज जरांगे हे उपोषणाला बसलेले आहेत त्यांची प्रकृती खालावलेली आहे, याचं गांभीर्य सरकारने लक्षात घेतले पाहिजे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे दिल्लीला विमानाने जातात. त्यांनी आधी जरांगे यांना एयरॲम्बुलन्सद्वारे उपचारासाठी न्यावे. तसेच या मुद्द्यावर दिल्लीत पंतप्रधानासोबत बैठक घ्यावी, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. आरक्षण विरोधी पक्षांनी टिकवल नाही, याबाबत संजय राऊत यांनी भाजपचा चांगला समाचार घेतला. ही मूर्खपणाची बडबड आता बंद करा, आम्ही देवेंद्र फडणवीस यांना शहाणे समजत होतो. मात्र, ते अतिशहाणे निघाले आहेत, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. तुम्ही व नरेंद्र मोदी यांनी हा प्रश्न सोडवला पाहिजे, उगाच धुराळा उडवू नका. मात्र, हा प्रश्न राज्य सरकार गांभीर्याने घेत नाही. कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे, अशी घणाघाती टीकाही राऊत यांनी केली. त्यांना भीमा-कोरेगाव सारख्या दंगली घडवायच्या का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत वक्तव्य केले आहे. जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे, त्यांच्या भावना या राज्य सरकारने समजून घ्याव्यात, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले असल्याचे राऊत यांनी सांगितले. याबाबत राज्य सरकारने आता तात्काळ अध्यादेश काढावा असे ते म्हणाले. सध्याची परिस्थिती पाहता राज्यामध्ये मध्यवर्ती निवडणूक होतील का यावर विचारले असता खासदार राऊत यांनी हे डरपोक सरकार आहे, हे मुंबई महानगरपालिकेच्या साध्या निवडणुका घेऊ शकत नाही ,तर इतर निवडणुका काय घेणार असा प्रतिसवाल केला. सरकार निवडणुका घ्यायला घाबरत आहे, हे सरकार षंढ आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली. हिंमत असेल तर मध्यवर्ती निवडणूक घ्या, आम्ही तयार आहोत, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मिंधे गटाचे एका खासदाराने राजीनामा दिला. यावर विचारले असता खासदार संजय राऊत यांनी हे नाटक हे ढोंग कशाला…मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे असे ते म्हणाले.

केंद्रामध्ये मंत्री असताना शरद पवार यांनी काहीच केले नाही असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. याबाबत राऊत यांनी मोदी यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. 70 वर्षात फक्त तेच जन्माला आले का, असा सवाल करत त्यांनी जबरदस्त टोला लगावला.