Photo – लाल छडी.. जान्हवी कपूरच्या हॉट फोटोंचा इंटरनेटवर जलवा

अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या भलतीच चर्चेत आहे. कॉफी विथ करणच्या नवीन भागात ती तिची बहीण खुशी हिच्यासोबत झळकणार आहे. अभिनयाच्या बाबतीत फारशा चर्चा नसल्या तरी जान्हवीच्या लूकच्या चर्चा नेहमीच होत असतात. त्या चर्चांमध्ये भर टाकायला की काय, तिने नुकतंच एक फोटोशूट केलं होतं. एरवी रिविलिंग कपड्यांमध्ये दिसणाऱ्या जान्हवीने या फोटोंत मात्र लाल रंगाचा बॉडीकॉन सूट परिधान केला आहे. एकही दागिना न घालता न्यूड मेकअप करून तिने तिचा हा लूक पूर्ण केला आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.