अनन्या पाण्डे करतेय ‘या’ अभिनेत्याला डेट, साराने केला खुलासा

बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक करण जोहरचा ‘कॉफी विथ करण 8’ या रिअॅलिटी शोचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. नव्या प्रोमोमध्ये केवळ या सिझनच्या कलाकारांची गेस्ट लिस्ट नाही तर अनेक सेलिब्रिटींची सिक्रेट्स समोर आली आहेत. यात आता सारा अली खानने अनन्याची एका सिक्रेट्सचा खुलासा केला आहे. अनन्या पाण्डे आणि आदित्य रॉय कपूरच्या अफेअर बाबत चर्चा रंगल्या होत्या, आता साराने या चर्चांवर शिक्कामोर्तब केले आहे.

‘कॉफी विथ करण’ 8 चा नवा प्रोमो सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. करण जोहर, सारा अली खानला प्रश्न विचारतो की, अशी कोणती गोष्ट आहे जी अनन्याकडे आहे आणि तुझ्याकडे नाही.त्याचे उत्तर देताना सारा अली खान बोलते – ‘द नाइट मॅनेजर’. हे ऐकून ती आधी डोळे खाली करते आणि मग म्हणते, ‘मला अनन्या आदित्य रॉय कपूरसारखी वाटते’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

‘द नाइट मॅनेजर’ वेब सिरीजमध्ये आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत होता. ज्याचा उल्लेख साराने स्पष्ट केला. अनन्या पाण्डेकडे आदित्य रॉय कपूर आहे. आदित्य रॉय कपूरने  द नाईट मॅनेजर वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. करण जोहरसोबतच्या सारा-अनन्याच्या चिट चॅटवरून अनन्या पाण्डे आणि आदित्य कपूर यांच्यात काहीतरी सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. सारा-अनन्या व्यतिरिक्त करीना-आलिया, राणी मुखर्जी-काजोल, अजय देवगण-रोहित शेट्टी यांच्यासह अनेक सेलिब्रिटी ‘कॉफी विथ करण 8’  च्या आगामी एपिसोडमध्ये दिसणार आहेत.