सहानभुतीच्या लाटेची मुनगंटीवारांना भिती; जाहीर भाषणात जनभावना दाबण्याचा प्रयत्न, अश्रूंचा अनादर

वाढलेली महागाई, शेतकऱ्यांची अवस्था, पक्ष पळवण्याचं राजकारण आणि जनतेची महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळणारी सहानभूती यामुळे भाजपला वाट अधिक अवघड झाली आहे. भाजपच्या उमेदवारांना परभावाच्या भितीनं ग्रासलं आहे. याच भितीतून सुधीर मुनगंटीवार यांनी तर आपल्याला खासदारकीचं तिकीट नको अशी विनंती केली होती. मात्र आता तिकीट मिळाल्यानंतरही भिती त्यांची पाठ सोडत नाही. मुनगंटीवार यांनी आज केलेल्या भाषणात तशीच भाषा वापरली आहे.

आज मुनगंटीवार यांनी केलेल्या वक्तव्याने त्यांची उंची कमी झाल्याचे राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. आमदार प्रतिभा धानोरकर यांच्याबद्दल मतदार संघात सहानुभूतीचं वातावरण आहे अशी चर्चा आहे. उमेदवारी जाहीर झाल्यावर धानोरकर नागपूर विमानतळावर आल्या होत्या. त्यांनी आपल्या मुलाला कवेत घेतलं तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले होते. आमदार धानोरकर यांच्याबद्दल मतदारांना सहानुभूती आहे. यावर मुनगंटीवार यांनी आज टिप्पणी केली. शक्ती प्रदर्शनाचापूर्वी चंद्रपूर शहरातील गांधी चौकात आज भाजपाची सभा झाली. या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर उपस्थित होते.

यावेळी ‘डोळ्यातील अश्रू बघून फक्त सहानुभितीवर मतदान कराल तर पाच वर्ष तुमच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला सतर्क करतोय’, अशा शब्दात त्यांनी जनभावनांचा आणि धानोरकरांच्या अश्रूंचा अनादर केल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे.