राज्यपाल नियुक्त 12 आमदार नियुक्तीबाबतची उच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली

mumbai-highcourt

मुंबई उच्च न्यायालयामध्ये 12 विधान परिषद आमदारांची राज्यपालांकडून होणाऱ्या नियुक्तीबाबतची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. 12 विधानपरिषद आमदार नेमण्यासंबंधी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यघटना विरुद्ध केलेल्या कृतीबाबत उच्च न्यायालयामध्ये ऑगस्ट 23 मध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे.

या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी चीफ जस्टिस यांच्यापुढे सिरीयल नंबर 21 ला सुनावणी होणार होती. मात्र, ही याचिका गुरुवारी रिच न झाल्यामुळे सुनावणी झाली नाही. आता पुढील तारखेला ही सुनावणी होईल व रीतसर यावर युक्तीवाद होतील, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कोल्हापूर शहर प्रमुख सुनील मोदी यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकारने 12 आमदारांच्या नावांची यादी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठवली होती. मात्र, राज्यपालांनी यावर कोणताही नर्णय घेतला नाही. त्यानंतर राज्यात सत्ताबदल झाल्यावर ही यादी त्यांनी सरकारकडे परत पाठवत नवीन नावांची शिफारस करण्यास सुचवले होते. तत्कालीन राज्यपालांची ही कृती घटनाविरोधी असल्याने याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.