उद्धव ठाकरे यांचा झंझावात हिंगोलीत, दोन दिवसात होणार जनसंवाद सभा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे येत्या 18 व 19 मार्च रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहे. हिंगोलीत उद्धव ठाकरे यांच्या पाच जनसंवाद सभा होणार आहेत. लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरची उद्धव ठाकरे यांची ही पहिली जनसंवाद सभा आहे.

सोमवारी 18 मार्च रोजी उद्धव ठाकरे यांची सकाळी साडे अकरा वाजता वसमत, 3 वाजता सेनगाव व नंतर 6 वाजता कळमनुरी येथे सभा होणार आहे. मंगळवारी 19 मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता उमरखेड व दुपारी 3 वाजता अर्धापूर येथे उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत.